Nagar : वन विभागाच्या पथकाने लाकडांचे तीन मालट्रक पकडले
टाकळी ढोकेश्वर : Bharat Live News Media वृत्तसेवा : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री धोत्रे व ढोकी दरम्यान लाकडे घेऊन जाणारे तीन मालट्रक वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वाहन चालकांविरोधात गुन्हा नोंदविला असून, कारवाईत 15 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. नगर व टाकळी ढोकेश्वर वनविभागाच्या संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गांगर्डे, सचिन गांगर्डे, वनरक्षक धर्मवीर थोरंबे, विजय ननवरे, गजानन वाघमारे, किरण जाधव, चालक दीपक रोकडे यांचा पथकात समावेश होता. चांगदेव सर्जेराव मुळे (रा. कल्याण), भाऊसाहेब विष्णू दराडे, काकासाहेब तुकाराम चौधरी (दोघेही शेेवगाव ) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या मालट्रकमधून जळाऊ लाकडांची वाहतूक करण्यात येत होती. त्यांना नगर येथील उपवनसंक्षकांसमोर हजर केले जाणार असून, ही कारवाई दंडात्मक कारवाई की अन्य याबाबतचा निर्णय जिल्हा वनविभाग घेणार आहे.
Latest Marathi News Nagar : वन विभागाच्या पथकाने लाकडांचे तीन मालट्रक पकडले Brought to You By : Bharat Live News Media.