सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यापासून त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी त्याला नेहमीच कडक सुरक्षा असते. पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये आज दोघांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. … The post सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यापासून त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची चूक टाळण्यासाठी त्याला नेहमीच कडक सुरक्षा असते.
पनवेल येथील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये आज दोघांनी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र या दोघांनी सलमान खानचे चाहते असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.
The post सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source