KGF स्टार यशच्या वाढदिनी बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने ३ ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विजेच्या खांबावर कन्नड अभिनेता यश याच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावत असताना तीन जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरनागी गावात मध्यरात्री एक वाजता झाला. KGF
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत हरिजन (24), मुरली नदूविनामानी (20) आणि नवीन गाजी (20) अशी मृतांची नावे आहेत.
गदगचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब नेमागौडा म्हणाले, “ वाढदिवसाचा बॅनर लावत असताना तिघांना विजेचा शॉक लागला तर तिघे जखमी झाले. बॅनरवर एक धातूची फ्रेम होती जी विद्यूत तारेच्या संपर्कात आली. याप्रकरणी लक्ष्मेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही याची चौकशी करू.” KGF
दरम्यान, नवीन कुमार गौडा असे आज (दि.8) आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 2007 मध्ये ‘जंबडा हुडुगी’ मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. ‘रॉकी’ (2008), ‘गुगली’ (2013) आणि ‘मि. आणि मिसेस रामाचारी’ (२०१४) या चित्रपटात त्याने काम केले आहे. ब्लॉकबस्टर KGF मालिकेतील त्याच्या रॉकी भाईच्या भूमिकेने त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती. ‘K.G.F: Chapter 1’ हा त्या वेळी सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला होता. तर भारतात स्टार म्हणून त्याला दर्जा मिळाला होता.
हेही वाचा
Actor Yash : KGF स्टार यशने नव्या चित्रपटाची केली घोषणा (Promo Video)
SRK vs Prabhas : २ तगड्या स्टार्सचा धुमाकूळ, शाहरुखचा ‘डंकी’ अन् Prabhas च्या ‘सालार’ची टक्कर
KGF-3 : केजीएफच्या चाहत्यांना मोठी खुशखबर! २०२५ ला रॉकीभाईचा पुढचा भाग?
Latest Marathi News KGF स्टार यशच्या वाढदिनी बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने ३ ठार Brought to You By : Bharat Live News Media.
