राजस्‍थानमध्‍ये भाजपला मोठा झटका, पोटनिवडणुकीत मंत्री सुरेंद्र सिंह पराभूत!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील करणपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुन्नर यांनी मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा पराभव केला आहे. या जागेवर काँग्रेसने 12570 मतांनी विजय मिळवला आहे. ( Karanpur Assembly By Election Results ) सुरेंद्र सिंह टीटी ठरणार भजनलाल सरकारमधील राजीनामा देणारे पहिले मंत्री शपथ घेतल्यानंतरच राजीनामा … The post राजस्‍थानमध्‍ये भाजपला मोठा झटका, पोटनिवडणुकीत मंत्री सुरेंद्र सिंह पराभूत! appeared first on पुढारी.

राजस्‍थानमध्‍ये भाजपला मोठा झटका, पोटनिवडणुकीत मंत्री सुरेंद्र सिंह पराभूत!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील करणपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुन्नर यांनी मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा पराभव केला आहे. या जागेवर काँग्रेसने 12570 मतांनी विजय मिळवला आहे.
( Karanpur Assembly By Election Results )
सुरेंद्र सिंह टीटी ठरणार भजनलाल सरकारमधील राजीनामा देणारे पहिले मंत्री
शपथ घेतल्यानंतरच राजीनामा देणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी हे पहिले मंत्री होऊ शकतात. तसेच मंत्रीपदाची शपथ घेवून पोटनिवडणुकीत पराभव होण्‍याची राजकारणातील ही दुर्मिळ घटना ठरली आहे. ( Karanpur Assembly By Election Results )
पोटनिवडणुकीचा निकाल येण्‍यापूर्वीच भाजपने सुरेंद्रपाल सिंह टीटी यांची भजनलाल सरकारमध्‍ये मंत्रीपदी वर्णी लागली होती. त्‍यामुळे करणपूर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राजस्‍थानचे लक्ष वेधले होते. आज या मतदारसंघातील मतमोजणी १८ फेऱ्यांमध्ये होती. काँग्रेसच्या रुपिंदर सिंह कुन्नर यांनी 12570 मतांच्‍या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
राजस्‍थान काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशाेक गेहलाेत यांनी रुपिंदर सिंह कुन्नर यांचे अभिनंदन केले आहे. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “श्रीकरणपूरमधील विजयाबद्दल काँग्रेसचे उमेदवार श्री रुपिंदर सिंग कुन्नर यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. हा विजय स्व. गुरमीत सिंग हे कुन्नरच्या जनसेवेच्या कामांना समर्पित आहेत.श्रीकरणपूरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या अभिमानाचा पराभव केला आहे.”

श्रीकरणपुर में कांग्रेस प्रत्याशी श्री रुपिन्दर सिंह कुन्नर को जीत की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। यह जीत स्व. गुरमीत सिंह कुन्नर के जनसेवा कार्यों को समर्पित है।
श्रीकरणपुर की जनता ने भारतीय जनता पार्टी के अभिमान को हराया है। चुनाव के बीच प्रत्याशी को मंत्री बनाकर आचार संहिता…
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 8, 2024

हेही वाचा : 

Lakshadweep Vs Maldives Row : लक्षद्वीपचे प्रमोशन, मालदीवचे डिमोशन
क्रिकेटपटू शाकिब खासदार झाला; पण ‘थप्पड़ की गूंज’मुळे वादात सापडला!
Bangladesh Election 2024 : बांगलादेशवर शेख हसीनांचे निर्विवाद वर्चस्व, मात्र संसदेतील ‘विरोधी पक्षा’वरुन पेच!

 
 
Latest Marathi News राजस्‍थानमध्‍ये भाजपला मोठा झटका, पोटनिवडणुकीत मंत्री सुरेंद्र सिंह पराभूत! Brought to You By : Bharat Live News Media.