टायगरसोबत झळकणार मिली फेम जान्हवी कपूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता टायगर श्रॉफ, वरूण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ‘डेडली’ या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाची निर्मिती करण जौहर, तर राज मेहता दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. (Deadly Movie ) ‘डेडली’ या सिनेमाचे कथानक अनुराग कश्यप लिहीत आहेत. या सिनेमाद्वारे जान्हवी आणि टायगर पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असून, या सिनेमात वरूण खलनायक साकारणार आहे. यांनी यापूर्वी ‘गुड न्यूज’ दिग्दर्शक राज मेहता आणि ‘जुग जुग जीयो’ यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. जान्हवीकडे यावर्षी अनेक सिनेमे आहेत. (Deadly Movie)
संबंधित बातम्या –
Bipasha Basu : कोट्यवधीची मालकीण असलेली बिपाशा उद्योजकही!
Copy Movie : ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल आज ओटीटीवर
Marathi Movie : अमोल कागणे प्रस्तुत “लॉकडाऊन लग्न” यादिवशी चित्रपटगृहात
यंदा ती ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’, राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि गुलशन देवयासोबत ‘उलझ’मध्ये झळकणार आहे. इतकेच नाही तर जान्हवी करण जोहरच्या ‘दुल्हनिया-३’मध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आली होती; पण आता या सिनेमात आलिया भट्ट झळकणार आहे. जान्हवीला बॉलीवूडमध्ये अद्याप फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे तिला आता ‘डेडली’ या सिनेमापासून फार अपेक्षा आहेत.
Latest Marathi News टायगरसोबत झळकणार मिली फेम जान्हवी कपूर Brought to You By : Bharat Live News Media.
