कोल्हापूर – ‘त्या’ लेकीचे बारसे घालणार कोण? कचर्‍यात सापडले अर्भक

कसबा बावडा : कसबा बावड्यात कचर्‍यामध्ये सापडलेल्या ‘त्या’ लेकीची प्रकृती आता उत्तम असून, तिला सातव्या दिवशी बालगृहात पाठवण्यात आले आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेत सहभागींचा समाजातून तीव्र निषेध होत आहे. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरत आहेत; पण दुसरीकडे त्या लेकीचे (नकोशीचे) बारसे घालणार कोण, असा भावुक प्रश्न उपस्थित होत आहे. (Kolhapur News) श्रीराम सेवा संस्था … The post कोल्हापूर – ‘त्या’ लेकीचे बारसे घालणार कोण? कचर्‍यात सापडले अर्भक appeared first on पुढारी.

कोल्हापूर – ‘त्या’ लेकीचे बारसे घालणार कोण? कचर्‍यात सापडले अर्भक

पवन मोहिते

कसबा बावडा : कसबा बावड्यात कचर्‍यामध्ये सापडलेल्या ‘त्या’ लेकीची प्रकृती आता उत्तम असून, तिला सातव्या दिवशी बालगृहात पाठवण्यात आले आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेत सहभागींचा समाजातून तीव्र निषेध होत आहे. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरत आहेत; पण दुसरीकडे त्या लेकीचे (नकोशीचे) बारसे घालणार कोण, असा भावुक प्रश्न उपस्थित होत आहे. (Kolhapur News)
श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोर रस्त्याकडेला कचर्‍यात एक दिवसाचे अर्भक टाकले होते. कुत्र्यांच्या झुंडी फिरत असलेल्या या ठिकाणावर महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची नजर जावी अन् त्या चिमुरडीला जीवदान मिळावे, अशा आठवणीने बावडा परिसरातील 2023 चा शेवट झाला. ज्याच्या जीवनाची दोरी बळकट असते ,त्याला कोणी काही करू शकत नाही याचे प्रत्यंतर या घटनेने पुन्हा एकदा समोर आले.
कसबा बावडा येथे गजबजलेल्या वस्तीत रस्त्याकडेला कचर्‍यामध्ये एक दिवसाचे स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी या अर्भकाला तत्काळ प्रथम सेवा रुग्णालयात व पुढे सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सात दिवसांच्या उपचारानंतर तिची प्रकृती उत्तम असल्याने तिला आता बालगृहाकडे सुपूर्द केले आहे. कमी वाढ झालेली किंवा पूर्ण वाढ झालेली, पण मृत बालके विविध ठिकाणी टाकल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत; पण एक दिवसाची जिवंत मुलगी रस्त्याकडेला कचर्‍यात टाकण्याच्या या घटनेने खळबळ माजली होती.
विशेष म्हणजे या मुलीला ज्या कापडात गुंडाळून टाकण्यात आले होते, त्यामध्ये राख, ओल्या व वाळलेल्या मिरच्याही टाकल्या होत्या. कचर्‍यात मुलीला टाकणार्‍यांचा हेतू यातून स्पष्ट होतो. मूल कोणत्या प्रसंगातून जन्मले या विषयावर समाजमाध्यमातून चर्चेची र्‍हाळ उडत असताना दुसरीकडे या मुलीच्या संगोपनाची जबाबदारीही चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे मुला-मुलींचे समाजातील प्रमाण व्यस्त असताना दुसरीकडे मुलग्याचीच अपेक्षा कुटुंबांकडून धरली जाते, हेही कारण चर्चेत आहे. यातून अनेक वेळा कुटुंबकलह निर्माण झाले आहेत. दातृत्वासाठी कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. याप्रसंगी पुढे काय होते, याचेही औत्सुक्य आहे. (Kolhapur News)
Latest Marathi News कोल्हापूर – ‘त्या’ लेकीचे बारसे घालणार कोण? कचर्‍यात सापडले अर्भक Brought to You By : Bharat Live News Media.