परत टोलनाक्यावर बांबू लावाल तर सर्वांना बांबू लावीन : राज ठाकरे

खालापूर ः Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी खालापूर टोल नाका येथे झालेली वाहतूक कोंडी पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाक्यांवर उतरुन सर्वप्रथम वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहीकेला रस्ता मोकळा करुन दिला. आणि आयआरबी व्यवस्थापकाची चांगलीच खरडपट्टी काढून परत टोल नाक्यावर बांबू लावाल तर सर्वांना बांबू लावीन, असा सज्जड दम दिला.
दरम्यान मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दुर करण्याकरिता टोल नाक्यांवर टाकण्यात येणारे बांबू ठाकरे यांनी उचलून ठेवायला लाऊन सर्व वाहने टोल न घेता सोडायला सांगितल्यावर काही सेकंदातच टोल नाका मोकळा झाला. (Raj Thackeray)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पिंपरी येथील नाट्यसंमेलनातील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे जात होते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोल नाक्यावर आल्यावर दोन्ही बाजूस झालेली वाहतूक कोंडी पाहून ठाकरे यांचा संताप अनावर झाला. कार्यकर्त्यांसह राज ठाकरे गाडीतून उतरून टोल बूथ जवळ जात टोल कर्मचार्यांची खरडपट्टी काढली. खालापूर टोल नाका व्यवस्थापकाला बोलावून राज ठाकरे यांनी धारेवर धरले. राज ठाकरे यांचा रुद्रावतार पाहून मुंबई पुण्याकडे जाणार्या सर्व लेन तातडीने खुल्या करण्यात आल्या. टोल न घेताच वाहने सोडण्यात आल्यानंतर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वाहतूक कोंडीत असलेला खालापूर टोल नाका मोकळा झाला.
हेही वाचा :
राज ठाकरे व्हीव्हीआयपी, उद्धव तर फक्त पहिल्या टर्मचे आमदार, अयोध्या सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजपची तिरंदाजी
‘मेरी मर्जी…’ महानगरपालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे असे का म्हणाले?
मुख्यमंत्री- राज ठाकरे यांची भेट, यावरून टोलचा झोल किती मोठा? हे कळते : विजय वडेट्टीवार
अजित पवार यांचे बंड ही शरद पवार यांची खेळी : राज ठाकरे
Latest Marathi News परत टोलनाक्यावर बांबू लावाल तर सर्वांना बांबू लावीन : राज ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.
