कोट्यवधीची मालकीण असलेली बिपाशा उद्योजकही!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री बिपाशा बसू सध्या बॉलीवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावरून खूपच चर्चेत असते. बिपाशा अगदी राजेशाहीत थाटात पती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत आयुष्य जगत आहे. बिपासा केवळ अभिनेत्री नाही तर ती एक उद्योजिकाही आहे. (Bipasha Basu) बिपाशा प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नींसोबत कोट्यवधींची उलाढाल करत आहे. अभिनेता अरबाज खान आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या पहिल्या पत्नी मलायका अरोरा आणि सुझान खान, बिपाशा व्यवसाय करत आहे. तिघी मिळून क्लोदिंग ब्रँड चालवतात.
संबंधित बातम्या –
Copy Movie : ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल आज ओटीटीवर
Marathi Movie : अमोल कागणे प्रस्तुत “लॉकडाऊन लग्न” यादिवशी चित्रपटगृहात
‘मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करणार’ : डॉ. जब्बार पटेल
‘द लेबल लाईफ’ असे त्यांच्या क्लोदिंग ब्रँडचे नाव आहे. बिपाशाकडे सुमारे १२४ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. तसेच मुंबईतील वांद्रे येथे तिचा आलिशान बंगलाही आहे. तिच्या बंगल्याची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. बिपाशाने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. दोघांना देवी नावाची एक वर्षाची मुलगी आहे. (Bipasha Basu)
View this post on Instagram
A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)
Latest Marathi News कोट्यवधीची मालकीण असलेली बिपाशा उद्योजकही! Brought to You By : Bharat Live News Media.
