पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ

पिंपळनेर: (जि. धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा; मराठी पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व जवाहर मेडिकल फाउंडेशन, धुळे यांच्यातर्फे साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या आवारात सर्वरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
सकाळी दहाला शिबिराचे उदघाटन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघांचे मार्गदर्शक प्रा.नरेंद्र तोरवणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार संघाचे मार्गदर्शक सुभाष काकुस्ते होते. तर जवाहर मेडिकल फाउंडेशनचे डॉ. गिरीष मोटे, डॉ.तन्वी पुंज, डॉ.सावणी डोळे, डॉ.शरद पाटील, डॉ. पदमनाभ मुळे, डॉ.रबेका, टीम चे प्रमुख हेमंत पाटील, रुग्णमित्र फिरोज खाटीक आदी उपस्थित होते.
सदर शिबिरात एकूण 165 नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तपासणीसाठी प्रत्येक विभागाची व्यवस्थित मांडणी पाहून जवाहर मेडिकल फाउंडेशन च्या पथकाने समाधान व्यक्त केले. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावीत, जि.प. सदस्य पोपटराव सोनवणे, भाडणे चे लोकनियुक सरपंच अजय सोनवणे यांनी शिबिरास भेट दिली. पत्रकार संघांचे सामाजिक कार्य पाहून डॉ. तूळशीराम गावीत यांनी पत्रकार संघांचे कौतुक करीत साक्री तालुका मराठी पत्रकार संघाला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनही केले.
प्रास्ताविक अध्यक्ष विजय भोसले यांनी केले. कार्याध्यक्ष धनंजय सोनवणे, सचिव लक्ष्मीकांत सोनवणे, उपाध्यक्ष भटू वाणी, सागर काकुस्ते, प्रसिद्धीप्रमुख पी.झेड.कुवर, सदस्य प्राचार्य बी.एम.भामरे, रघुवीर खारकर, अंबादास बेनुस्कर, दगाजी देवरे, किशोर गादेकर, अमृत मंगा सोनवणे, दिनेश वकारे, लतीफ मन्सुरी, सुकलाल सूर्यवंशी, रतनलाल सोनवणे, राहुल सोनवणे, हेमंत महाले, योगेश हिरे, बाबूद्दीन शाह यांचेसह जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या आशिष चव्हाण, रोहित हजारे, राहुल पाटील, चेतन पाटील, दिव्या नेहारे, दिपाली चौधरी, मयुरी वाघ, राहुल सरगल, समाधान पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
हेही वाचा :
Bangladesh Election 2024 : बांगलादेशवर शेख हसीनांचे निर्विवाद वर्चस्व, मात्र संसदेतील ‘विरोधी पक्षा’वरुन पेच!
Nashik News : युवा महोत्सव तयारीत पालिका प्रशासन, उद्योजकांना पुन्हा प्रतिक्षेचे ग्रहण
ते मंदिरात जातात हेही नसे थोडके ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Latest Marathi News पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ Brought to You By : Bharat Live News Media.
