शाहू महाराजांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट, केएसएसह विविध शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा संस्था, तालीम मंडळे आणि संघटनांचे मुख्य आश्रयदाते (चिफ पेट्रन) शाहू महाराज यांचा 76 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी दिवसभर न्यू पॅलेस परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, वाढदिवसानिमित्त विविध संस्था, संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन … The post शाहू महाराजांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव appeared first on पुढारी.

शाहू महाराजांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट, केएसएसह विविध शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा संस्था, तालीम मंडळे आणि संघटनांचे मुख्य आश्रयदाते (चिफ पेट्रन) शाहू महाराज यांचा 76 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी दिवसभर न्यू पॅलेस परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, वाढदिवसानिमित्त विविध संस्था, संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.
न्यू पॅलेसच्या प्रांगणात रात्री वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी सौ. याज्ञसेनी महाराणी, संभाजीराजे, मालोजीराजे, सौ. संयोगिताराजे, सौ. मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे उपस्थित होते. यानंतर शाहू महाराज यांना दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, खासदार धैर्यशील माने, कॅ. शिवाजी महाडकर, डॉ. संजय डी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, व्ही. बी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, अ‍ॅड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, डॉ. देविका पाटील, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, हिंदकेसरी विनोद चौगुले, पै. विष्णू जोशीलकर, पै. रेश्मा माने, डॉ. अजय केणी, उद्योजक सतीश घाडगे, व्यंकाप्पा भोसले, अनुराधा भोसले, पारस ओसवाल, जयेश ओसवाल, प्रसाद कामत, धैर्यशील पाटील-कौलवकर, राहुल आवाडे, विश्वविजय खानविलकर, बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, नील पंडीत, मेजर जनरल ए. बी. सय्यद, दिलीप मंडलिक, ब्रिगेडियर अभिजीत वाळींबे, कर्नल विजयसिंह गायकवाड, कर्नल अलेक्स मोहन, कर्नल अमरसिंह सावंत, सौ. श्रृती कुल्लोली, कुलदीप कुमार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाहू महाराज यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सकाळी छत्रपती शाहू विद्यालयातही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार जयश्री जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, उद्योजक संजय घोडावत, माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, आर. के. पोवार, पै. बाबा महाडिक, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दिगंबर फराकटे, अर्जुन माने, प्रकाश नाईकनवरे, देवस्थान समिती व्यवस्थापक महादेव दिंडे, शाहीर आझाद नायकवडी, आरोग्य दूत बंटी सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी नगरसेवक विक्रम जरग, संजय मोहिते, सचिन चव्हाण, ईश्वर परमार, सुनील मोदी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के. जी. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव, डॉ. अर्जुन आडनाईक यांच्यासह राजर्षी शाहू मॅरेथॉन, बिनखांबी गणेश मित्र मंडळ, विविध पेठांतील तालीम-संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News शाहू महाराजांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव Brought to You By : Bharat Live News Media.