वर्षभरात 49 हजार कुटुंबांचा गृहप्रवेश

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहरामध्ये गेल्या कॅलेंडर वर्षात (2023) तब्बल 49,266 घरांची नोंद झाली आहे. घरांच्या विक्रीत 2022 च्या तुलनेत तब्बल 13.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर कार्यालयीन जागांचे 67 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. नाईट फ्रँक इंडियाने 2023 चा रियल इस्टेटचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. पुण्याच्या रियल इस्टेट … The post वर्षभरात 49 हजार कुटुंबांचा गृहप्रवेश appeared first on पुढारी.

वर्षभरात 49 हजार कुटुंबांचा गृहप्रवेश

पुणे :  Bharat Live News Media वृत्तसेवा :  पुणे शहरामध्ये गेल्या कॅलेंडर वर्षात (2023) तब्बल 49,266 घरांची नोंद झाली आहे. घरांच्या विक्रीत 2022 च्या तुलनेत तब्बल 13.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर कार्यालयीन जागांचे 67 लाख चौरस फुटांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. नाईट फ्रँक इंडियाने 2023 चा रियल इस्टेटचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. पुण्याच्या रियल इस्टेट क्षेत्रात गेल्या दशकातील सर्वाधिक उलाढाल 2023मध्ये पाहायला मिळाली. शहरात 2013 नंतर सर्वाधिक घर खरेदी गेल्यावर्षी झाली. गृहकर्जाचे दर वाढले असले, तरी खरेदीदांराचा कल आशादायक असल्याचे पाहायला मिळाले. मागणी वाढल्याने 2023मध्ये नवीन प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाणही मोठे होते. तर, गेल्यावर्षी तब्बल 42,437 नव्या सदनिका विक्रीसाठी आल्या. त्यात 2022च्या तुलनेत दहा टक्क्यांची वाढ दिसून आली.
शहरात झालेल्या घरांच्या विक्रीत 50 लाख ते एक कोटी रुपयांदरम्यान असलेल्या घरांचा वाटा 2022 साली 43 टक्के होता. त्यात 46 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर, 50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील घरांचा वाटा 48 वरून 38 टक्क्यांवर आला आहे. तर, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत कार्यालयीन जागांची विक्री नऊ टक्क्यांनी वाढून 67 लाख चौरस फुटांवर गेली आहे. कार्यालये भाडेकराराने घेण्याच्या व्यवहारात पाच टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली.

2023 मध्ये दशकातील सर्वाधिक सदनिकांची विक्री
गेल्या कॅलेंडर वर्षात घरांच्या विक्रीत 13.5 टक्क्यांची वाढ
50 लाख रुपयांवरील घरांची विक्री 35 टक्क्यांनी वाढली
कार्यालयीन जागांचे 67 लाख चौरस फुटांचे व्यवहार

Latest Marathi News वर्षभरात 49 हजार कुटुंबांचा गृहप्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.