शरद मोहोळ खून : हल्लेखोरांच्या तोंडी गोळ्या झाडताना एका गँगस्टरचे नाव

पुणे/ कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचे नाव घेतले व आम्ही त्यांची पोरं असल्याचे म्हटलं आहे.  त्यामुळे शरद मोहोळ याचा खून टोळी युद्धाच्या संघर्षातून तर झाला नाही ना ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा … The post शरद मोहोळ खून : हल्लेखोरांच्या तोंडी गोळ्या झाडताना एका गँगस्टरचे नाव appeared first on पुढारी.

शरद मोहोळ खून : हल्लेखोरांच्या तोंडी गोळ्या झाडताना एका गँगस्टरचे नाव

पुणे/ कोथरूड : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर पळून जात असताना त्यांनी एका गँगस्टरचे नाव घेतले व आम्ही त्यांची पोरं असल्याचे म्हटलं आहे.  त्यामुळे शरद मोहोळ याचा खून टोळी युद्धाच्या संघर्षातून तर झाला नाही ना ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुन्नाने शरद मोहोळचा खून केल्याचा दावा केला आहे. आता एका गँगस्टरचे नाव पुढे आले असले तरी शरदचा गेम नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला त्या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

मामा नामदेव कानगुडे याच्यासाठी काहीही करण्याची साहील ऊर्फ मुन्ना पोळेकरची तयारी होती. शरद मोहोळच्याच परिसरात तो वास्तव्यास आहे. सहा महिन्यांपासून त्याने मोहोळ टोळीत प्रवेश करण्यास सुरुवात केली होती. मात्र, शरदने त्याला दूर केले होते. तरी देखील पोळेकरने आपले प्रयत्न सोडले नाहीत. दररोज तो शरदच्या इतर साथीदारांसोबत त्याच्याकडे जात होता. शेवटी त्याने शरदसोबत जवळीक निर्माण केली. काही दिवसात तो त्याचा खास झाला. त्याच्यासोबत बॉडीगार्डप्रमाणे फिरू लागला. दीड महिन्यांपासून तो शरदच्या मर्जीत राहू लागला.

मात्र, त्याच्या डोक्यात वेगळीच योजना होती. अखेर शुक्रवारी त्याने आपल्या योजनेला मूर्तरूप दिले. एरवी गर्दीच्या गराड्यात असलेला शरद मोजक्याच लोकांसोबत कार्यालयाकडून घराकडे निघाला असताना पाठीमागून पोळेकरने तीन गोळ्या झाडल्या, तर इतर साथीदारांनी समोरून दोन गोळ्या झाडल्या. शरद जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढताना त्यांनी एका मोठ्या गँगस्टरचे नाव घेतल्याचे पोलिस दप्तरी दाखल असलेल्या कागदपत्रावरून समोर आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शरदच्या खुनाचा कट पोळेकर, मामा कानगुडे आणि इतरांनी अगोदरपासूनच रचला असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी मोहोळचा खून केल्यानंतर त्यांनी त्या गँगस्टरचे नाव का घेतले ? खरंच त्याचा या गुन्ह्यामागे सहभाग आहे का ? आरोपी मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या मामाला वाचविण्यासाठी त्या गँगस्टरचे नाव घेतले  का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र त्या गँगस्टरचे नाव का घेतले?, हा प्रश्न  अद्यापही अनुत्तरित आहे. त्यामुळे ‘गणपती दर्शनासाठी जात असताना शरदला मारणे’ हा प्लॅन मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी केव्हा आखला याचाही तपास  पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे रक्तचरित्राला लागला होता ब्रेक
मागील काही वर्षांत पोलिसांनी राबविलेल्या कडक धोरणांमुळे बरेच गुंड कारागृहात तर काही गुंड अंडरग्राऊंड झाले होते. मागील तीन वर्षांत तब्बल पुण्यातील 200 हून अधिक टोळ्यांना मोक्का लावल्यामुळे पोलिसांकडून गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील काही वर्षे टोळ्या- टोळ्यांमधील रक्तचरित्राला ब्रेक लागला होता. मात्र, शरद मोहोळच्या खुनामुळे टोळ्यांमधील संघर्षाला या निमित्ताने खतपाणी तर मिळाले नाही ना ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

Maldives tweet on India : PM मोदींवर आक्षेपार्ह टीका, मालदीवच्‍या राजदुतांना समन्‍स
फडणवीसांना दोन पदांचा कार्यभार पेलवेना : खासदार सुप्रिया सुळे

Latest Marathi News शरद मोहोळ खून : हल्लेखोरांच्या तोंडी गोळ्या झाडताना एका गँगस्टरचे नाव Brought to You By : Bharat Live News Media.