मुंबई पोलिसांतील १ उपायुक्त, २ निरीक्षकांवर बलात्काराचा आरोप
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बलात्काराच्या आरोपामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. १ उपायुक्त आणि २ निरीक्षकांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. ८ महिला शिपायांच्या तक्रारीच्या पत्राची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिस दलासह राज्यभर खळबळ माजली आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
पीडित महिला मोटर वाहन विभागात काम करतात. संबंधित अधिकाऱ्यांनी सरकारी गाडीतून घरी नेवून बलात्कार केल्याचा आरोप या व्हायरल पत्रातून केला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, व्हायरल पत्रावरील सह्या आपल्या नसल्याचे यातील काही महिलांनी म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे, हे सीबीआय चौकशीनंतर समोर येईल.
हेही वाचा :
फडणवीसांना दोन पदांचा कार्यभार पेलवेना : खासदार सुप्रिया सुळे
निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा, हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार
Latest Marathi News मुंबई पोलिसांतील १ उपायुक्त, २ निरीक्षकांवर बलात्काराचा आरोप Brought to You By : Bharat Live News Media.