मिरजेतील रेल्वे पूल सहापदरी होणार!

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे पूलदेखील आता सहापदरी करण्यात येणार आहे. परंतु, जुना पूल न पाडता त्याच्या दोन्ही बाजूला नव्याने पूल उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर जुना पूल पाडून ते नव्या पुलाला जोडण्यात येईल, असा निर्णय पुण्यात रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुरेश खाडे, … The post मिरजेतील रेल्वे पूल सहापदरी होणार! appeared first on पुढारी.

मिरजेतील रेल्वे पूल सहापदरी होणार!

मिरज; Bharat Live News Media वृत्तसेवा : मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे पूलदेखील आता सहापदरी करण्यात येणार आहे. परंतु, जुना पूल न पाडता त्याच्या दोन्ही बाजूला नव्याने पूल उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर जुना पूल पाडून ते नव्या पुलाला जोडण्यात येईल, असा निर्णय पुण्यात रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुरेश खाडे, मध्य रेल्वे पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे मुंबई सदस्य सुकुमार पाटील उपस्थित होते. मिरज-सांगली रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल हा जीर्ण झाल्याने नुकतेच त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये हा पूल जुना झाला असून तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करावी, अशी सूचना देखील स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तसेच हा पूल पाडून नव्याने बांधण्याबाबत देखील रेल्वेकडून हालचाली सुरू झाल्या होत्या.
परंतु हा पूल पाडून नव्याने उभारण्यासाठी किमान चार ते पाच महिन्यांचा अवधी लागणार होता. हा पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यास सांगली आणि मिरजेच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबणार होती. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार होती. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता करूनच पूल पाडण्याची भूमिका सांगलीकरांनी घेतली होती. त्यानुसार पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि रेल्वेच्या अधिकार्‍यांची बैठक देखील पार पडली होती. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांनी देखील या पुलाची पाहणी केली होती.
त्यामुळे या पुलाबाबत निर्णय घेण्यासाठी पुण्यात रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हा पूल पाडू नये अशी ठाम भूमिका पालकमंत्री खाडे यांनी घेतली. तसेच या पुलामुळेच सांगली ते मिरज सहापदरी रस्त्याचे काम देखील रखडल्याचे बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता मिरज रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस दोन पदरी रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात येईल. त्यानंतर मुख्य जुना पूल पाडण्यात येईल. तो नव्याने बांधून नवीन पुलांना जोडण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नव्याने पूल उभारल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार आहे.

Latest Marathi News मिरजेतील रेल्वे पूल सहापदरी होणार! Brought to You By : Bharat Live News Media.