‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग’; शिक्षणमंत्री असं का म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग आहे, तर शाळेचा मार्ग हा प्रकाशाचा मार्ग आहे,’ असे बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. आरजेडी आमदार फतेह बहादूर यांच्या मंदिराच्या पोस्टरचे समर्थन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी स्वतःचे नव्हे तर सावित्रीबाई फुले यांचे शब्द पुन्हा सांगितले आहेत, असे देहरी, रोहतास येथे एका कार्यक्रमात … The post ‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग’; शिक्षणमंत्री असं का म्हणाले? appeared first on पुढारी.
‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग’; शिक्षणमंत्री असं का म्हणाले?


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग आहे, तर शाळेचा मार्ग हा प्रकाशाचा मार्ग आहे,’ असे बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. आरजेडी आमदार फतेह बहादूर यांच्या मंदिराच्या पोस्टरचे समर्थन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी स्वतःचे नव्हे तर सावित्रीबाई फुले यांचे शब्द पुन्हा सांगितले आहेत, असे देहरी, रोहतास येथे एका कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखर यांनी म्हणाले.
मंत्री चंद्रशेखर म्हणाले, “फतेह बहादूर आपले शब्द बोलले नाहीत, उलट त्यांनी देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या शब्दांची पुनरावृत्ती केली. आता एकलव्याचा मुलगा अंगठा दान करणार नाही, शहीद जगदेव प्रसाद यांचा मुलगा यापुढे अंगठा दान करणार नाही. आता आहुती कशी घ्यायची हे त्याला माहीत आहे, असे ते म्हणाले.
चंद्रशेखर असे का म्हणाले?
देहरीतील आरजेडी आमदार फतेह बहादूर यांनी काही दिवसांपूर्वी पोस्टर लावले होते, ज्यामध्ये मंदिर म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग, तर शाळा म्हणजे प्रकाशाकडे जाणारा मार्ग असे म्हटले होते. पोस्टरमध्ये आरजेडीचे संस्थापक लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे फोटो होते. परंतु पक्षाने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही. मंत्री चंद्रशेखर यांनी त्यांच्या या पोस्टरचे समर्थन केले आहे.
आरजेडी आमदाराची जीभ कापणाऱ्याला बक्षीस
आमदार फतेह बहादूर यांच्या पोस्टरनंतर पाटण्यातील हिंदू संघटनेने त्यांची जीभ छाटणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पाटण्यातील आमदारांच्या फ्लॅटजवळ हिंदू शिव भवानी सेनेचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. यामध्ये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा : 

PM मोदींच्‍या आवाहनाचा ‘इफेक्‍ट’, लक्षद्वीपच्‍या बुकिंगमध्‍ये लक्षणीय वाढ!
.. तर कल्‍पना सोरेन होणार झारखंडच्‍या मुख्‍यमंत्री : अंजली सोरेन यांचे मोठे विधान
उत्तरेत थंडीची लाट; दिल्लीतील प्राथमिक शाळांना पुढील ५ दिवस सुट्टी

The post ‘मंदिराचा मार्ग हा गुलामीचा मार्ग’; शिक्षणमंत्री असं का म्हणाले? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source