राशीन-भिगवण रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू
राशीन : Bharat Live News Media वृत्तसेवा : राशीन-भिगवण रस्त्यावरील वायसेवाडी शिवारात जीप- दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. अनिकेत आजीनाथ राऊत (वय 20) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. राशीन-भिगवण खेडकडून येणारी जीप आणि राशीनवरून खेडकडे चाललेल्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात अनिकेत राऊतचा मृत्यू झाला. अपघातानंतर नवनाथ हरिदास राऊत यांच्या फिर्यादीवरून जीपचालकाविरोधात राशीन पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अमोल लोंखडे करीत आहेत.
एकुलता एक मुलगा
अनिकेतच्या आजोबांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता अनिकेतचा अपघातात मृत्यू झाल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिकेत एकुलता एक मुलगा होता.
Latest Marathi News राशीन-भिगवण रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.