भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अफगाणिस्तानने शनिवारी भारताविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 19 सदस्यीय संघाची घोषणा केली. नियमित टी-20 कर्णधार राशीद खान संघात नक्कीच आहे; पण पाठीच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे इब्राहिम झद्रानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रहमानउल्ला गुरबाज संघाचा उपकर्णधार असणार आहे. फिरकीपटू मुजीब-उर-रहमान, ज्याला एनओसी रद्द … The post भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा appeared first on पुढारी.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अफगाणिस्तानने शनिवारी भारताविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 19 सदस्यीय संघाची घोषणा केली. नियमित टी-20 कर्णधार राशीद खान संघात नक्कीच आहे; पण पाठीच्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे इब्राहिम झद्रानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रहमानउल्ला गुरबाज संघाचा उपकर्णधार असणार आहे.
फिरकीपटू मुजीब-उर-रहमान, ज्याला एनओसी रद्द झाल्यानंतर त्याचा ‘बीबीएल’चा 13 वा सीझन सोडून भारतीय दौर्‍यासाठीच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या यूएईविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत मुजीबही सहभागी नव्हता. यूएईविरुद्धच्या राखीव संघाचा भाग असलेल्या इकराम अलीखिलला बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज म्हणून मुख्य संघात बढती देण्यात आली आहे.
‘एसीबी’चे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ म्हणाले, तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आमच्या पहिल्याच भारत दौर्‍यावर येताना आम्हाला आनंद होत आहे. भारत हा जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे आणि अफगाणिस्तानला त्यांच्याविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळताना पाहणे खूप आनंददायी ठरेल. आम्ही भारताविरुद्धच्या अत्यंत स्पर्धात्मक मालिकेसाठी उत्सुक आहोत.
भारताविरुद्ध अफगाणिस्तान संघ : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (उपकर्णधार), इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशीद खान.
Latest Marathi News भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.