परभणी : न-हापूर येथे बैलांची वाहतूक करणारा टेंम्पो उलटला; दोन बैलांसह चालक जखमी

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : बैलांची वाहतूक करणाऱ्या टेंम्पोला अपघात होऊन दोन बैलांसह टेंम्पोचालक जखमी झाला. आज रविवारी (दि.७) पूर्णा- नांदेड या मुख्य रोडवरील न-हापूर गावाजवळ सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, बैलांची वाहतूक करणारा पिकअप टेंम्पो ((क्रमांक एम एच २२ ए.एन ४३४२ ) परभणीहून पूर्णा मार्गे नांदेकडे भरधाव वेगाने जात होता. न-हापूर गावाजवळ येताच चालकाचा टेंम्पोवरील ताबा सुटल्याने टेंम्पो पलटी झाला. या अपघातात दोन बैलांसह चालक साबेर शेख जखमी झाले. टेंम्पोत तीन बैल होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत शेख यांच्यासह बैलांना बाहेर काढले. न-हापूर गावाजवळ गतिरोधक नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.
हेही वाचा :
Dog swallowed money : कुत्र्याने गिळले ३ लाख, मालकाने ‘या’ मार्गाने मिळवले काही पैसे
कोल्हापूर : उदगाव पुलावरून कार नदीत कोसळली
Mumbai : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक
Latest Marathi News परभणी : न-हापूर येथे बैलांची वाहतूक करणारा टेंम्पो उलटला; दोन बैलांसह चालक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
