विदर्भातील लोकसभेच्या १० जागा लढविण्याची भाजपची तयारी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकीकडे जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये रोज नवी समीकरणे पुढे येत असताना आता विदर्भातील १० ही मतदारसंघात ‘कमळ’ या चिन्हावर भाजपचे उमेदवार लढावेत, अशी भाजपची पूर्वतयारी सुरू आहे. भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनीही यासंदर्भात दुजोरा दिला आहे. Nagpur BJP भाजपच्या कमळ या चिन्हावरच विदर्भातील सर्व … The post विदर्भातील लोकसभेच्या १० जागा लढविण्याची भाजपची तयारी appeared first on पुढारी.

विदर्भातील लोकसभेच्या १० जागा लढविण्याची भाजपची तयारी

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात एकीकडे जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये रोज नवी समीकरणे पुढे येत असताना आता विदर्भातील १० ही मतदारसंघात ‘कमळ’ या चिन्हावर भाजपचे उमेदवार लढावेत, अशी भाजपची पूर्वतयारी सुरू आहे. भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनीही यासंदर्भात दुजोरा दिला आहे. Nagpur BJP
भाजपच्या कमळ या चिन्हावरच विदर्भातील सर्व खासदार लढावेत, अशी कार्यकर्त्यांची, आमची इच्छा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. येत्या १४ जानेवारीरोजी नागपुरात महायुतीचा मेळावा होणार असून यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट व अजितदादा गट या तीनही पक्षांचे नेते एका व्यासपीठावर येणार आहेत. एकीकडे काँग्रेसने १८ ते २० जानेवारी दरम्यान नागपुरात विभाग पातळीवर जिल्हा काँग्रेसच्या बैठका आयोजित केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने मकर संक्रांतीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यात आपली शक्ती एकवटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. Nagpur BJP
अर्थातच शिवसेना शिंदे गटाकडे गेलेल्या विदर्भातील खासदारांची यामुळे कोंडी होण्याची शक्यता आहे. रामटेक, यवतमाळ वाशिम, बुलढाणा व अमरावती अशा चार जागा शिवसेना सातत्याने लढवत आली आहे. शिंदे गटाच्या तेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळेल, असा विश्वास असला तरी काही जागांची अदलाबदल होऊ शकते असे संकेत शिंदे गटातूनच मिळत असल्याने भाजप विदर्भातल्या दहा जागांवर फोकस करीत असल्याचे बोलले जाते. याविषयीचे चित्र नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा 

Nagpur Airport : तरुणाला हार्ट अटॅक; पुणे-लखनऊ विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
Nagpur Rain : नागपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
नागपूर : पोटच्या मुलाची जन्मदात्याने केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री

Latest Marathi News विदर्भातील लोकसभेच्या १० जागा लढविण्याची भाजपची तयारी Brought to You By : Bharat Live News Media.