तलाठी भरती परीक्षा २०० गुणांची; उमेदवाराला पडले २१४ गुण : विजय वडेट्टीवारांचे ट्विट चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी (SIT) चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल, तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करत आहे. आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला आहे, आता स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
“तलाठी भरती परीक्षा” हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.
200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत… https://t.co/GZPRip8BJ5
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 7, 2024
हेही वाचा
बळीराजाला कर्जमुक्त करा, वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
Chandrapur News: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याविरोधी काँग्रेसचा मोर्चा
Latest Marathi News तलाठी भरती परीक्षा २०० गुणांची; उमेदवाराला पडले २१४ गुण : विजय वडेट्टीवारांचे ट्विट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
