नगर : कोल्हे कारखान्यास सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार

कोपरगावः पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्यावतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास जाहिर झाला आहे. पुणे येथे 11 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने पुरस्कारासाठी ठरविलेले निकष पूर्ण करण्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक … The post नगर : कोल्हे कारखान्यास सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार appeared first on पुढारी.

नगर : कोल्हे कारखान्यास सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार

कोपरगावः Bharat Live News Media वृत्तसेवा : वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्यावतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास जाहिर झाला आहे. पुणे येथे 11 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने पुरस्कारासाठी ठरविलेले निकष पूर्ण करण्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी यश मिळवले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा घेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासदांच्या सहकार्याने कारखान्याची घौडदौड यशस्वीरित्या सांभाळत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी कार्यक्षम वापर केलेला आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची आधुनिक विचारसरणी जपत त्यानुरूप दैनंदिन गाळप क्षमतेसह विविध रासायनिक उपपदार्थ निर्मीतीत यशस्वी मार्गाक्रमण केले.
त्यात निर्माण होणार्‍या अडचणींची सोडवणूक करून ई महिंद्रा कृषी उपग्रह कार्य प्रणालीच्या सहाय्याने उस लागवडीपासून ते गाळपापर्यंतचे नियोजन, ड्रोन फवारणी तंत्र उपलब्ध करून जैविक खतासह संजीवनी सेंद्रीय खत सभासद शेतकर्‍यांना अनुदानावर उपलब्ध करून देत खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च कमी करून चांगला नक्त मुल्यांक निर्देशांक ठेवला. शेतकर्‍यांच्या बांधावर थेट ऊस लागवडीसह विविध घटकांचे मार्गदर्शन देत आहे. या पुरस्कारासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटने वेगवेगळ्या प्रकारचे 25 निकष ठेवले होते, ते सर्वच्या सर्व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने परिपुर्ण केल्याने सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
दरम्यान, या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, महासंचालक संभाजीराव कडु पाटील, माजी महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते 11 जानेवारीला पुणे (मांजरी बुद्रुक) येथे प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून रेणा सहकारी साखर कारखान्याने सदरचा पुरस्कार पुरस्कृत केला आहे.
हेही वाचा

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही : अजित पवार
अवकाळीने ज्वारी झाली भुईसपाट; शेतकरी बेजार
रोहित पवारांवरील कारवाई सूडबुद्धीने : माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत

Latest Marathi News नगर : कोल्हे कारखान्यास सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार Brought to You By : Bharat Live News Media.