‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही’

ठाणे; दिलीप शिंदे : राज्यात लागू करण्यात आलेले ६२ टक्के आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, अशी भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलायजमा ठेवला जाणार नाही, असा इशारा नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा … The post ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही’ appeared first on पुढारी.
‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही’

ठाणे; दिलीप शिंदे : राज्यात लागू करण्यात आलेले ६२ टक्के आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, अशी भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलायजमा ठेवला जाणार नाही, असा इशारा नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा आज कल्याण – मुरबाड रोडवरील वरप या गावी घेण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर नामोउल्लेख टाळून टीका केली. मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र इतर आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊन घेतला जाईल. सध्या ६२ टक्के आरक्षण आहे. ओबीसी, एस. टी, एस. सी. सह ५२ टक्के आरक्षण असून १० टक्के आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. हे आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, असे सांगताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काही जण टोकाची भूमिका घेत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या घटनेनुसार देश चालत आहे, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मुलायजमा ठेवला जाणार नाही. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसल्याच त्यांनी म्हटलं आहे. हा एकप्रकारे जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे.
दुसरीकडे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना वाचाळवीर असे संबोधत उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांचं वाढलेले वय आणि निवृत्ती बाबत टीकास्त्र सोडले. ८४ वय झाले तरी काही जण निवृत्त होण्यास, थांबण्यास तयार नाहीत, किती हट्टीपणा, ऐकायला तयार नाहीत, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजप सोबत गेल्याच्या भूमिकेचे समर्थन केले. तर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांना खोटे बोलण्याचे डॉक्टरेट दिले पाहिजे, असे सांगताना २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली नसती तर महविकास आघाडी सरकार टिकले नसते, असा दावा तटकरे यांनी आव्हाड यांच्या टीकेला उत्तर देताना केला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, नजीब मुल्ला, आमदार दौलत दरोडा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा : 

सरकारला मुद्द्यावर बोलायला भाग पाडू-रोहित पवार
महात्मा गांधी यांच्यावर चित्रपटसृष्टीने प्रचंड प्रेम केले : प्रकाश मगदूम
भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना

Latest Marathi News ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही’ Brought to You By : Bharat Live News Media.