खंडणी, अपहरणाचे प्रकरण; प्रहार जनशक्तीचे संतोष मोहिते यांना अटक

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी खंडणी तसेच बचत गटातील महिलाच्या सांगण्यावरून धमकावून पैशांच्या मागणीप्रमाणे तडजोड होत नसल्याने फिर्यादीच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहीते याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे. यातील सहआरोपी महिला फरार झाली आहे. संतोष मोहीते (रा. भोंगवली, ता. भोर) आणि बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री … The post खंडणी, अपहरणाचे प्रकरण; प्रहार जनशक्तीचे संतोष मोहिते यांना अटक appeared first on पुढारी.

खंडणी, अपहरणाचे प्रकरण; प्रहार जनशक्तीचे संतोष मोहिते यांना अटक

नसरापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी खंडणी तसेच बचत गटातील महिलाच्या सांगण्यावरून धमकावून पैशांच्या मागणीप्रमाणे तडजोड होत नसल्याने फिर्यादीच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहीते याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे. यातील सहआरोपी महिला फरार झाली आहे. संतोष मोहीते (रा. भोंगवली, ता. भोर) आणि बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री गोरक्ष थिटे (रा. हातवे खुर्द, ता. भोर) अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे असून जयश्री थिटे या फरार आल्या आहेत. संतोष मोहिते याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना सप्टेंबर ते दि. 31 डिसेंबर पर्यंत किकवी (ता. भोर) येथे घडली. याप्रकरणी राजेंद्र लक्ष्मण पालखे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष मोहीते याने फिर्यादी राजेंद्र पालखे यांचा मुलगा कृष्णांत यास’तू अवैध प्रवासी वाहतूक करतो, प्रवासी वाहतुकीची गाडी चालवायची असेल तर मला पैसे द्यावे लागतील’ असे म्हणून पैशासाठी तगादा लावला. या दरम्यान 10 हजार रूपये खंडणी त्याने घेतली.
त्यानंतर हातवे बुद्रुक येथील बचत गटातील जयश्री थिटे हिच्या सांगण्यावरून किकवी येथील प्रहार जनशक्ती ऑफिसला बोलावून संतोष मोहिते व जयश्री थिटे या दोघांनी फिर्यादीला धमकावले. मोहिते याने फिर्यादीला बचत गटाच्या व्यवहारापोटी तडजोड करतो असे सांगून त्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांनी पैसे देत नसल्याचे संतोष मोहिते याला समजल्यानंतर फिर्यादी यांचा मुलगा कृष्णांत (वय 30) याचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के करीत आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित घटनेतील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. फरार झालेल्या महिलेला लवकरच अटक करण्यात येईल.
विनय झिंजुर्के, पोलिस उपनिरीक्षक, किकवी दूरक्षेत्र

हेही वाचा

Rohit Pawar: सरकारला मुद्द्यावर बोलायला भाग पाडू-रोहित पवार
दुर्दैवी ! शिक्रापुरात क्रेनखाली चिरडून आजीसह नातीचा मृत्यू
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद

Latest Marathi News खंडणी, अपहरणाचे प्रकरण; प्रहार जनशक्तीचे संतोष मोहिते यांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.