मालकिणीचे दागिने लंपास करणारी मोलकरीण चतुर्भुज

डोंबिवली : Bharat Live News Media वृत्तसेवा, पश्चिम डोंबिवलीत राहणाऱ्या एका गृहिणीच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला क्राईम ब्रॅचच्या कल्याण युनिटने मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. मालकीणीच्या घरातून १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास करून पसार झालेल्या मोलकरणीला ताब्यात घेतले खरे, पण ती मी नव्हेच असा कांगावा करणाऱ्या मोलकरणीने पोलिसी दट्ट्या पडताच चोरीची कबुली दिली. या चोरट्या मोलकरणीकडून क्राईम बँचने २ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. (Dombivli) गंगूबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी (५०) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून कल्याण कोर्टात हजर केले असता कोटनि तिला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dombivli : मालकिणीचे दागिने लंपास
पश्चिम डोंबिवलीत खेती रोड परिसरात आशापुरा कृपा सोसायटीत राहणाऱ्या आस्था रणधीर पाटील यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्यात मालकीण पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा क्राईम बॅचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याच दरम्यान क्राईम ब्रैचचे हवा. विश्वास माने आणि पोशि गुरूनाथ जरग यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात मालकीण आस्था पाटील या राहत असलेल्या सोसायटीबाहेरच्या कंपाऊंडवरून एक महिला संशयीतरित्या ये-जा करताना आढळून आली, एकीकडे या महिलेला पोनि राहूल मस्के, सपोनि संदीप चव्हाण, उपनि संजय माळी, हवा. विश्वास माने, हवा. बालाजी शिंदे, हवा, दत्ताराम भोसले, हवा. किशोर पाटील, हवा. विलास कडू, हवा. मेघा जाने, हवा. मिनाक्षी खेडेकर, पोशि मंगल गावित, आदींचे पथक तपास करत होते. तर दुसरीकडे संशयीत महिलेचे वर्णन तक्रारदार आस्था पाटील यांना दाखवून खात्री केली असता ही महिला आस्था यांच्या घरी काम करणारी मोलकरीण गंगूबाई उर्फ गिता दळवी हीच असल्याचे समोर आले. क्राईम ब्रचने गंगूबाईला मोठा गावातून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तांत्रिक विश्लेषणासह चौकशी केली असता तिने मालकीण आस्था पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. क्राईम ब्रचने गंगूबाईकडून तिने चोरलेले सर्व १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. चोरीस गेलेले दागिने परत मिळवून देणाऱ्या क्राईम ब्रचचे फिर्यादी आस्था पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा
Mumbai : ११ वर्षीय चिमुरड्याचा रेकॉर्ड! धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ९ तास ५ मिनिटांत पार
Sanjay Raut Vs CM Shinde: शिवसेना कधीही दिल्लीच्या आदेशाने चालली नाही: संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
Latest Marathi News मालकिणीचे दागिने लंपास करणारी मोलकरीण चतुर्भुज Brought to You By : Bharat Live News Media.
