केवायसी अपडेटच्या नावाने पोलीस निरीक्षकाची ऑनलाईन फसवणूक

मुंबई : केवायसी अपडेटबाबत बँकेतून कधीच विचारणा होत नाही असे वारंवार बँकेसह पोलिसांकडून सांगण्यात येत असताना अज्ञात सायबर ठगाने मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याला केवायसी अपडेटच्या नावाने सुमारे पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Cyber Fraud)
Cyber Fraud : पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक
खेरवाडी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. चेंबूर येथे राहणारे तक्रारदार पोलीस निरीक्षक असून ३ जानेवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन केवायसी अपडेट करा, नाहीतर त्यांचे बँक खाते बंद होईल असे सांगितले. त्याने पाठवलेल्या अॅपमधून केवायसी अपडेट करण्यासाठी डेबीट कार्डसह इतर माहिती अपलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार होऊन सुमारे पाच लाख रुपये डेबीट झाले.
हेही वाचा
Mumbai : ११ वर्षीय चिमुरड्याचा रेकॉर्ड! धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ९ तास ५ मिनिटांत पार
PM Modi On Aditya-L1 Mission: ‘आदित्य एल-१’ ची ऐतिहासिक झेप! PM मोदींकडून इस्रो शास्त्रज्ञांचे विशेष अभिनंदन
Latest Marathi News केवायसी अपडेटच्या नावाने पोलीस निरीक्षकाची ऑनलाईन फसवणूक Brought to You By : Bharat Live News Media.
