जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून जेजुरीला पाणी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीला पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जेजुरी शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. जेजुरी शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजना असणार्‍या मांडकी डोहातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्याने जेजुरीचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. मांडकी डोहातील आलेल्या पाण्याचे जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. तीर्थक्षेत्र … The post जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून जेजुरीला पाणी appeared first on पुढारी.

जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून जेजुरीला पाणी

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीला पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जेजुरी शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. जेजुरी शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजना असणार्‍या मांडकी डोहातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्याने जेजुरीचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. मांडकी डोहातील आलेल्या पाण्याचे जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले.
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीला 1974 पासून नाझरे धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होत होते. सन 2000 मध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने तातडीची मांडकी डोहावरील पाणी पुरवठा योजना सुरु केल्याने त्यावेळी पाणी प्रश्न मिटला होता. यावर्षी नाझरे धरण क्षेत्रात केवळ 333 मिलीमीटर पाण्याची नोंद झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही. परिणामी गेली सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले होते. जेजुरी शहराला पर्यायी असणार्‍या मांडकी डोहातील योजना गेली तीन ते चार वर्षांपासून बंद होती. जलवाहिन्या फुटल्या होत्या, वीज बिलाची थकबाकी मोठी होती.
जेजुरी शहराला आठवड्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले होते. आमदार संजय जगताप, माजी नगरध्यक्षा विना सोनवणे यांच्यासह माजी नगरसेवक यांनी मांडकी डोहातून पाणी मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. आ. जगताप यांच्या प्रयत्नातून थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागून सुमारे 40 लाखांचा पहिला वीज बिलाचा हप्ता भरण्यात आला. मांडकी डोहावर विजेसाठी नवीन डीपी बसविण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून जलवाहिन्याची दुरुस्ती मागील दोन महिन्यात करण्यात आली. शनिवारी (दि. 6) मांडकी डोहातून जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, पाणी पुरवठा विभागाचे राजेंद्र दोडके, दशरथ कुरुडकर, प्रशांत कुदळे आदींनी सहकार्य केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
शनिवारी मांडकी डोह योजनेतून पाणी आल्याने जेजुर नगरपालिकेचे माजी गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेवक महेश दरेकर, रुक्मिणी जगताप, हेमंत सोनवणे, सुशील राऊत, देवसंस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडे, जेजुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर, संतोष तोडकर यांच्या हस्ते यावेळी जलपूजन करण्यात आले. गेली दोन वर्षे जेजुरी पालिकेत प्रशासक असून सत्ता नसताना देखील जेजुरीकर नागरिक व भाविकांची तहान भागविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी यांनी सतत ही योजना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नांतून मांडकी डोहावरील पाणी योजना सुरु झाली असून जेजुरी शहराला आता चार दिवसांऐवजी सोमवारपासून दोन दिवसांनी पिण्याचे पाणी मिळणार आहे, असे सचिन सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा

‘या’ बेटावर महिलांना बंदी; पुरुषांनाही नियम
ऐतिहासिक नाटकांतून सोयीचा इतिहास दाखविणे थांबवावे : शरद पवार
तब्बल 125 वर्षांपासून कैदेत आहे ‘हे’ झाड!

 
Latest Marathi News जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून जेजुरीला पाणी Brought to You By : Bharat Live News Media.