पवारसाहेब तिथं होते, म्हणून मी.. : अजित पवार

मोशी : 100 व्या नाट्य संमेलनावेळी सकाळी मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. शरद पवार साहेब तिथं होते, म्हणून मी आलो नाही, असं काही नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवारसाहेब असताना मी तिथं जातोच. उगाचंच काहीही गैरसमज पसरवू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मोशी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद … The post पवारसाहेब तिथं होते, म्हणून मी.. : अजित पवार appeared first on पुढारी.

पवारसाहेब तिथं होते, म्हणून मी.. : अजित पवार

मोशी : 100 व्या नाट्य संमेलनावेळी सकाळी मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. शरद पवार साहेब तिथं होते, म्हणून मी आलो नाही, असं काही नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवारसाहेब असताना मी तिथं जातोच. उगाचंच काहीही गैरसमज पसरवू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मोशी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, की राज्याचे मुख्यमंत्री नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते, त्याबद्दल मी स्वतः अधिवेशन झाल्यावर बैठक घेतली होती, त्याला अनेकजण उपस्थित होते. मोठा निधी कार्यक्रमासाठी दिला आहे.
त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी केला. माझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. नाट्यसंमेलनाचा इतिहास पाहिला तर व्यासपीठावर फक्त नाट्य परिषद संबंधित लोक होते. मात्र, आता बदल झाला आहे. साहित्य संमेलन, नाट्यसंमेलनात पूर्वीचे नेते अगदी यशवंतराव चव्हाण साहेब हे खाली म्हणजे मंचाच्या समोर बसायचे. मी जबाबदारीतून कुठं अंग काढलं का. ज्यांनी त्याच काम करावं.
अजित पवार म्हणाले, की इंद्रायणी प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष द्यायला हवं, ते लक्ष देत नसतील तर नागरिकांना पीआयएल करता येईल. पण मी तातडीनं त्यात लक्ष घालतो.
आमदार कांबळे यांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीबाबत पवार म्हणाले, की आमदार कांबळे यांनी माझ्या समोर कोणाला मारलं असतं तर मी शांत बसलो असतो का? मी पुढच्या कार्यक्रमाच्या घाईत होतो. त्यामुळं राष्ट्रगीत होताच बाहेर पडलो. अजित पवार म्हणाले, की राज ठाकरे यांनी किती सहकारी संस्था उभारल्या हे त्यांनी सांगावे. मी आतापर्यंत 32 वर्षांत सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करतोय.
हेही वाचा

Mumbai : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक
शरण येण्याबाबत केला पोलिसांना कॉल; वकिलांची न्यायालयासमोर साक्ष
उद्योगनगरीत नाट्यरसिकांची मांदियाळी; शंभराव्या नाट्यसंमेलनास प्रारंभ

Latest Marathi News पवारसाहेब तिथं होते, म्हणून मी.. : अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.