मुंबई : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर येथील एका शैक्षणिक संस्थेला सहा कोटीची देणगी देण्याची बतावणी करुन संस्थेच्या संचालकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या कटातील दोन मुख्य आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. साईबल सोपान गांगुली आणि नंदकिशोर ज्ञानदेव लोंढे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. … The post मुंबई : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक appeared first on पुढारी.

मुंबई : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदनगर येथील एका शैक्षणिक संस्थेला सहा कोटीची देणगी देण्याची बतावणी करुन संस्थेच्या संचालकाची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या कटातील दोन मुख्य आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. साईबल सोपान गांगुली आणि नंदकिशोर ज्ञानदेव लोंढे अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai)
Mumbai : ४५ लाखांचा अपहार
या गुन्ह्यांतील प्रविण येवरे, खांडेकर आणि यश या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. नामदेव चंद्रकांत राऊत हे अहमदनगरचे रहिवाशी असून त्यांच्या मालकीची समाज प्रबोधक आणि शैक्षणिक संस्था आहे. बिबिशन गायकवाड हे त्यांच्या परिचित असून चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांची नंदकिशोर लोंढेशी ओळख करुन दिली. नंदकिशोरने त्यांना देणगी देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांना किमान पन्नास लाख रुपये आगाऊ द्यावे लागणार होते. त्यांनी त्यांना टप्याटप्याने ४५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र त्यांनी त्यांना देणगीचा धनादेश दिला नाही.
हेही वाचा 

भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना
Sanjay Raut Vs CM Shinde: शिवसेना कधीही दिल्लीच्या आदेशाने चालली नाही: संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

 
Latest Marathi News मुंबई : सहा कोटींच्या देणगीसाठी ४५ लाखांचा अपहार; दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.