उद्योगनगरीत नाट्यरसिकांची मांदियाळी; शंभराव्या नाट्यसंमेलनास प्रारंभ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी काढण्यात आली. चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली. या वेळी सिनेनाट्य कलावंत आणि लोककलावंतांच्या सहभागामुळे सर्व परिसर कलाकारमय झाला होता. नाट्यदिंडी निघण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी केलेली पारपंरिक … The post उद्योगनगरीत नाट्यरसिकांची मांदियाळी; शंभराव्या नाट्यसंमेलनास प्रारंभ appeared first on पुढारी.

उद्योगनगरीत नाट्यरसिकांची मांदियाळी; शंभराव्या नाट्यसंमेलनास प्रारंभ

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी काढण्यात आली. चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली. या वेळी सिनेनाट्य कलावंत आणि लोककलावंतांच्या सहभागामुळे सर्व परिसर कलाकारमय झाला होता. नाट्यदिंडी निघण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी केलेली पारपंरिक वेशभूषा ढोल – ताशांचा गजर यांनी परिसर दुमदुमून गेला होता.
नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. या वेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरुवात झाली. गांधी पेठ, तानाजीनगरमार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आली.
नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरुवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.
अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पृहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह कलावंत सहभागी झाले होते.
हेही वाचा

भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना
Kolhapur News: हातकणंगलेनजीक युवकाचा खून; मृतदेहाची ओळख पटली
तब्बल 125 वर्षांपासून कैदेत आहे ‘हे’ झाड!

Latest Marathi News उद्योगनगरीत नाट्यरसिकांची मांदियाळी; शंभराव्या नाट्यसंमेलनास प्रारंभ Brought to You By : Bharat Live News Media.