माता न तू वैरीण! मोखाड्यात सापडले अर्भक, चालकाने दिले जीवदान

मोखाडा : हनिफ शेख : समाजात एकीकडे जगात आईचे महत्व सांगणारी, आई आपल्या मुला बाळासाठी प्रसंगी जीवही देऊ शकते अन् जीवही घेऊ शकते अशी अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिलेली आहेत. मात्र, मोखाडा तालुक्यात माता न तू वैरिण असल्याची वेळ आली असून तालुक्यात पुरुष जातीचे एक जिवंत अर्भक सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या पोराला बेवारस सोडून टाकणाऱ्या ‘त्या’ मातेबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असून समाजात मुल बाळ व्हावं यासाठी असंख्य उपचार, प्रयत्न करणारी अनेक जोडपी असताना पोटाच्या गोंडस बाळाला मारण्यासाठी बेवारस सोडून देणाऱ्या अशा प्रवृत्तीमुळे खर तर अनेक चर्चांना आता उधाण आले आहे. (Palghar)
Palghar : पुरुष जातीचे अर्भक
याबाबत मोखाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील वाशाळा येथे राहणारा पेशाने चालक असलेला आकाश लहामगे व्यवसाय निमित्ताने पोशेरा फाट्यावरून वाखारीचापाडा गावच्या शिवारात नदीच्या पात्राच्या आसपास लाल कपड्यात एक अनोळखी अंदाजे २ दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक त्याला आढळून आले. अशा वेळी त्याने गाडी थांबवून तो सगळा प्रकार पाहिला. अशावेळी आकाश यांनी आरोग्य सेवकचे काम करीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकास कळवले. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांना ही माहिती दिल्यानंतर मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खरं तर संबंधित अर्भक जिवंत असल्यामुळे काही वेळापूर्वीच सोडून गेल्याचा अंदाज आहे. तर अगदी रस्त्याच्या कडेला नदी पात्रापासून लांब सदर अर्भक सोडल्यामुळे खर तर सोडणाऱ्यालाही ते जिवंत राहावं असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून सदर अर्भकास पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, पोलीस उप निरीक्षक संजय भुसाळ करीत आहेत.
‘मी संपूर्ण तालुक्यात माझ्या पीकअप वाहनातून माल वाहतूक करीत असतो. आज नेहमीप्रमाणे जाताना मला एका पुलाजवळ काहीतरी लाल कपड्यात गुंडाळलेले दिसले. खात्री केल्यावर त्यामध्ये एक बाळ असल्याचे दिसले. लगेच आरोग्य विभागात असलेल्या भावाला कळवले. एक माणूस म्हणून मी माझे कर्तव्य केले.
– आकाश लहामगे, (वाहन चालक, वाशाळा)
हेही वाचा
व्यभिचाराविरोधात कायदा नाही, याचा अर्थ दुसर्या विवाह करता येतो असा नाही : दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ; 14 ठाण्यांमध्ये ५ हजार ७७४ गुन्हे दाखल
Sanjay Raut Vs CM Shinde: शिवसेना कधीही दिल्लीच्या आदेशाने चालली नाही: संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
Latest Marathi News माता न तू वैरीण! मोखाड्यात सापडले अर्भक, चालकाने दिले जीवदान Brought to You By : Bharat Live News Media.
