पिलीभीतच्या शाळेतील मुलं बोलतात चक्क तेरा भाषा!

लखनौ : उत्तरप्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यात एक अशी शाळा आहे ज्यामध्ये शिकणारी मुलं एक-दोन नव्हे तर तेरा भाषा बोलू शकतात. मरौरी ब्लॉक उच्च प्राथमिक स्कूल कैंचमधील या मुलांचे कौशल्य लोकांना थक्क करते. या शाळेतील मुलं तेलुगु, तामिळ, मल्याळी, संथाली अशा अनेक भाषांमध्ये अभिवादन करू शकतात तसेच आपापसात संवादही करू शकतात. कैंचीमधील या शाळेतील मुलांचे पालक त्यासाठी … The post पिलीभीतच्या शाळेतील मुलं बोलतात चक्क तेरा भाषा! appeared first on पुढारी.

पिलीभीतच्या शाळेतील मुलं बोलतात चक्क तेरा भाषा!

लखनौ : उत्तरप्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यात एक अशी शाळा आहे ज्यामध्ये शिकणारी मुलं एक-दोन नव्हे तर तेरा भाषा बोलू शकतात. मरौरी ब्लॉक उच्च प्राथमिक स्कूल कैंचमधील या मुलांचे कौशल्य लोकांना थक्क करते. या शाळेतील मुलं तेलुगु, तामिळ, मल्याळी, संथाली अशा अनेक भाषांमध्ये अभिवादन करू शकतात तसेच आपापसात संवादही करू शकतात. कैंचीमधील या शाळेतील मुलांचे पालक त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना श्रेय देतात.
सरकारने शाळकरी मुलांमध्ये भाषेच्या माध्यमातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा भाव जागृत करण्यासाठी उत्तेजन दिले आहे. त्यासाठी सरकारने सर्व शाळांमध्ये ‘भाषा संगम’ कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये शाळांमध्ये रोज मुलांना देशात बोलल्या जाणार्‍या एखाद्या भाषेचा परिचय करून देण्यास सांगण्यात आले होते. कैंचीमधील शाळेने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवला. तेथील मुलांनी मल्याळी, मराठी, उर्दू, तामिळ, तेलुगु, सिंधी, पंजाबी, संथाली यासारख्या तेरा भाषांमधील पायाभूत शिक्षण घेतले आहे. या भाषांबरोबरच वेगवेगळ्या राज्यांमधील संस्कृतीचा परिचयही शाळेत करून दिला जातो.
Latest Marathi News पिलीभीतच्या शाळेतील मुलं बोलतात चक्क तेरा भाषा! Brought to You By : Bharat Live News Media.