Special Report : मामा भाच्याच्या टोळीने संपविले मोहोळचे आयुष्य !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांपूर्वी नामदेव कानगुडेसोबत शरद मोहोळचा वाद झाला होता. त्यावेळी शरदने नामदेवला मारहाण केली होती. नामदेव पूर्वी सुतारदरा येथेच राहत होता. त्यानंतर तो मुळशीकडे गेला. हा अपमान नामदेवच्या जिव्हारी लागला होता. भाचा मुन्ना पोळेकरचा मामा नामदेववर मोठा जीव. मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचे मुन्नाने ठरवले. त्यासाठी नियोजन करून शरदच्या जवळ गेला … The post Special Report : मामा भाच्याच्या टोळीने संपविले मोहोळचे आयुष्य ! appeared first on पुढारी.

Special Report : मामा भाच्याच्या टोळीने संपविले मोहोळचे आयुष्य !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दहा वर्षांपूर्वी नामदेव कानगुडेसोबत शरद मोहोळचा वाद झाला होता. त्यावेळी शरदने नामदेवला मारहाण केली होती. नामदेव पूर्वी सुतारदरा येथेच राहत होता. त्यानंतर तो मुळशीकडे गेला. हा अपमान नामदेवच्या जिव्हारी लागला होता. भाचा मुन्ना पोळेकरचा मामा नामदेववर मोठा जीव. मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचे मुन्नाने ठरवले. त्यासाठी नियोजन करून शरदच्या जवळ गेला व  खास मर्जीतला बनला. त्याची दररोज शरदसोबत ऊठबस होऊ लागली होती. सावलीप्रमाणे तो शरदच्या सोबत वावरत होता. त्यामुळे शरद गाफील राहिला. शुक्रवारी संधी मिळताच मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी शरदचा गेम केला. सहा महिन्यांपूर्वी कट रचून गँगस्टर शरद मोहोळचा खून करण्यासाठी मामा-भाच्याने टोळी तयार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळचा खून करुन मुन्नाने आपल्या मामाच्या अपमानाचा बदला घेतला. यामुळे त्याला ना खुनाचा खेद, ना खंत होती. याउलट त्याने खून केल्यावर कायदेशीर प्रक्रियेसाठी अगोदरच वकिलांशी सल्ला मसलत केली होती. खुनाच्या अगोदर दोन दिवस तो वकिलांच्या संपर्कात होता. इतकेच नव्हेतर खून केल्यानंतर तो पळून जातानाही वकिलांसोबतच सापडला.
शरद मोहोळ आणि आरोपी मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे यांचे दहा वर्षापासूनचे वैमनस्य आहे. मोहोळच्या पंटर लोकांनी नामदेव कानगुडेला मोहोळच्या सांगण्यावरुन दहा वर्षापूर्वी मारहाण केली होती. तसेच हिंजवडी येथील एका जागेच्या व्यवहारातील कमिशनवरुन त्यांच्यातील वादही पेटला होता. मोहोळ कारागृहात अंडा सेलमध्ये असल्याने मधल्या काळात त्यांना काही करता आले नाही.

दरम्यान मोहोळ कारागृहातून बाहेर आल्यावर मागील काही महिने ते संधीच्या शोधात होते. मोहोळ बाहेर आल्यापासून उघडपणे परिसरात फिरत होता. त्याने इतर टोळ्यांशी जुळवून घेतले होते. तसेच तो राजकारण आणि जमिनीच्या व्यवहारात जम बसवू पाहत होता. नेमकी हीच संधी साधून कानगुडेने आपला भाचा मुन्नाला मोहोळच्या जवळ जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मुन्ना मागील महिनाभर मोहोळसोबत सावलीसारखा वावरत होता. तो मोहोळला काय हवे नको ते पाहायचा. शिवाय विवाह, समारंभ आणि देवदर्शन आदी सर्व ठिकाणी तो मोहोळसोबत असायचा. ऐवढचे नव्हे तर जेवताणाही दोघे एकत्रच असायचे. अशाप्रकारे मुन्नाने मोहोळचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. दरम्यान मुन्ना स्वत:सोबत कट्टा घेऊन फिरु लागला.

मात्र मोहोळला तो आपल्या संरक्षणासाठीच बाळगत असल्याचा समज झाला. त्याच्या मनातही हे नव्हते की मुन्ना कधी आपला गेम करेल. दरम्यान मामा-भाच्यांनी पध्दतशीरपणे कट आखून माणसांची जुळवा-जुळव केली. यामध्ये एक विठ्ठल गांदले हा छायाचित्रकारही होता. त्यालाही शरद मोहोळने एकदा मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या मनातही बदल्याची भावना होती. ठरल्यानुसार एका बेसावध क्षणी मुन्नाने दोघा साथीदारांच्या मदतीने तीन पिस्तुलातूंन तब्बल पाच गोळ्या झाडत मोहोळचा खून केला.
मोहोळला हिंदू नेता म्हणून तयार करायची होती प्रतिमा
कतिल सिद्दीकीच्या खुनानंतर मोहोळ आपली प्रतिमा हिंदू नेता म्हणून तयार करत होता. इतकेच नव्हेतर मागील काही दिवसांत त्याने सोशल मीडियावर राम मंदिरासंदर्भात एक पोस्टही केली होती. काही हिंदू संघटनांच्या  तो सातत्याने संपर्कात होता.  यामुळे तो दोन समाजात तेढ निर्माण करत नाही ना? याची खात्री पोलिस सातत्याने करत होते. मोहोळच्या खुनानंतर पोलिसांना तशी शक्यताही वाटली. मात्र तसे काही निघाले नाही. मोहोळ मागील काही दिवस आपण सगळ्यांशी जुळवून घेतल्याने आता आपली कोणाशी दुश्मनी नसल्याचे सांगत होता. या अति आत्मविश्वासातूनच तो उघडपणे सर्वत्र वावरत होता. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून स्वत:ला किंवा पत्नीला तिकीट मिळविण्याच्या तयारीतही होता. यामुळे त्याच्या खूनामागे काही राजकीय कारण आहे का? याचाही तपास  पोलिस करत आहेत.
सुरुवातीपासूनच गुन्हेगारीचे आकर्षण
मुन्ना कोळेकरला सुरवातीपासूनच गुन्हेगारीचे आकर्षण असल्याचे दिसून येते. समाज माध्यमांवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडीओ त्याने अपलोड केले आहेत. त्यामुळे त्याच्या डोक्यात आधीपासूनच कोणाचा तरी गेम करायचा असल्याचे दिसते. मामा नामदेव ऊर्फ पप्पू कानगुडे युवा मंच मुळशी अशी टॅग लाईनच त्याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटला ठेवली आहे. त्यानं अपलोड केलेला प्रत्येक व्हिडीओ कोणाला तरी संदेश देण्यासाठी केलेला असावा असा कयास बांधला जात आहे. तसेच गँगस्टर होण्यासाठीच  मुन्नाने शरद मोहोळचा गेम केला?, अशी चर्चा होत आहे.
मोहोळच्या अंत्ययात्रेला गर्दी
मोहोळच्या मृतदेहावर शुक्रवारी मध्यरात्री नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहोळच्या अंत्यसंस्कारासाठी मुळशी, पुणे शहरातील साथीदारांनी गर्दी केली. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी रस्त्यावरून चालणेदेखील अवघड झाले होते. या भागातील सर्व रस्त्यांवर वाहने लावण्यात आली होती. कोथरूड भागातील राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मोहोळच्या अंत्यसंस्कार उपस्थिती लावली. वैकुंठ स्मशानभूमीत परिसरात मध्यरात्री मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
बेसावध क्षणी संपवले
शरद मोहोळने त्याचे जुने घर ऑफीसमध्ये रूपांतरीत केले होते. नवीन घरापाशी चालत येऊन तो गाडीने पुढे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाला होता. दुपारच्या सुमारास मोहोळ घराबाहेर पडल्यानंतर त्याच्या बरोबरच असलेल्या मुन्नाने काही एक समजण्याआधीच त्याच्यावर पाठीत गोळ्या झाडल्या. तर एका बाजूने अमित कानगुडेने पिस्तुल चाववली. तर विठ्ठल गांदलेने समोरून छातीवर धडाधड गोळ्या झाडला. त्यामुळे मोहोळ खाली पडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
खर्‍या कारणांचा शोध सुरू
विठ्ठल गांदले हा मुळचा मुळशी येथील असून तो फोटोग्राफीचे काम करायचा. त्याला देखील शरद मोहोळने शिवीगाळ केली होती.  तर पोळेकरचा मामा असलेल्या नामदेव कानगुडेवर शरदच्या खुनासह तीन गुन्हे दाखल आहेत. तर पोळेकरचा जवळचा साथीदार अमित कानगुडे आहे.  विनायक गव्हाणकर आणि नामदेव कानगुडे हे जवळचे मित्र आहेत. नामदेव कानगुडेला म्हणजे मुन्ना पोळेकरच्या मामाला शरद मोहोळने काही वर्षापूर्वी मारहाण केली होती. त्याचाच बदला घेतल्याचे व सर्व समदु:खी एकत्र येऊन गँग तयार केली असल्याचे पोलिसांकडून बोलले जात असले तरी खुनाला आणखी देखील कंगोरे असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा आहे. हिंजवडीच्या जमिनीच्या एका प्रकरणावरून शरद मोहोळचे वाद झाले होते. त्या वादाची किनार  आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
पोळेकरचे इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ व टॅगलाईन…

हम भी बडे परींदे है जनाब, जिस दिन उडेंगे उस दिन पुरा आसमान कम पड जायेगा….
नाय भेटणार तुमच्यासारखे मित्र आख्खे जग शोधून, येणार ओ लवकर येरवडा जेलमधून
पुष्पा नाम सुनके फ्लावर समझी क्या, फायर हे अपुन….
आम्ही आमचे मार्केट स्वतः निर्माण केलं आहे, याच्या त्याच्याकडे शेपूट नाही हलवलं…
बॉडी नसली म्हणून काय झालं शेठ….. अंगाला हात पण लागू देणार नाही… असा मामा आहे आपला…
ज्यांनी बाहुबली बघितला त्याचा मामावरचा विश्वास उडाला त्यांचा मामा असेल फितुर…आपला मामा नाही भावांनो फितुर आपला मामा आपल्या काळजाचा तुकडा हे….

हेही वाचा

राज्‍यरंग : ईशान्येतील ‘शांतता पर्व’
आता चक्क लाकडापासून बनणार स्मार्टफोनची स्क्रिन
विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे : डॉ.जब्बार पटेल

Latest Marathi News Special Report : मामा भाच्याच्या टोळीने संपविले मोहोळचे आयुष्य ! Brought to You By : Bharat Live News Media.