कांद्याचा अर्क मधुमेहावर गुणकारी?

न्यूयॉर्क : जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत. विशेषतः भारत तर मधुमेहाची राजधानीच बनला असल्याचे नेहमी म्हटले जाते. अशा वेळी मधुमेहावर सातत्याने संशोधने होत असतात. एका संशोधनानुसार कांद्याचा अर्क मधुमेहावर रामबाण उपाय ठरू शकतो. यासंदर्भातील एका संशोधनाचा अहवाल समोर आला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदा हा मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त आणि परिणामकारक आहे. सन 2022 मध्ये अमेरिकातील सॅन डियागोमध्ये एडोक्राइन सोसायटीच्या 97 व्या वार्षिक बैठकीमध्ये कांद्याच्या अर्काचा मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो यासंदर्भातील संशोधन अहवाल सादर करण्यात आला. ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नियमितपणे कांद्याच्या अर्काचं सेवन केल्याने रक्तामधील साखरेचं प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत मिळू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
इतकेच नाही तर कांद्याचा अर्ज मधुमेहाबरोबरच कोलेस्टेरॉल आणि स्थूलपणा नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायद्याचा ठरु शकतो. अर्थात यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचंही सांगितले जात आहे. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. यामध्ये मधुमेह असलेल्या उंदरांना वजनाप्रमाणे 400 मिलीग्राम आणि 600 मिलीग्राम कांद्याचा अर्क देण्यात आला होता. या उंदरांच्या रक्तातील साखरेचं प्रमाणे 50 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं दिसून आले. ज्या उंदरांना या प्रयोगादरम्यान कांद्याचा अर्क देण्यात आला होता त्यांचं कोलेस्टेरॉल नियंत्रणात होते.
Latest Marathi News कांद्याचा अर्क मधुमेहावर गुणकारी? Brought to You By : Bharat Live News Media.
