भाजपची रणनिती ठरणार; राज्यातील 48 मतदारसंघांचा आज पुण्यात आढावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम लवकरच सुरू होत असताना, राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी जागावाटपापूर्वीच्या तयारीवर भर दिला आहे. भाजपचे नेते राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा रविवारी (दि. 7) पुण्यात घेणार आहेत. या बैठकीत भाजपची रणनिती निश्चित होणार आहे. भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने, या बैठकीला महत्त्व … The post भाजपची रणनिती ठरणार; राज्यातील 48 मतदारसंघांचा आज पुण्यात आढावा appeared first on पुढारी.

भाजपची रणनिती ठरणार; राज्यातील 48 मतदारसंघांचा आज पुण्यात आढावा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम लवकरच सुरू होत असताना, राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी जागावाटपापूर्वीच्या तयारीवर भर दिला आहे. भाजपचे नेते राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा रविवारी (दि. 7) पुण्यात घेणार आहेत. या बैठकीत भाजपची रणनिती निश्चित होणार आहे.
भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने, या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख 70 नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील पक्षाचे मंत्री, प्रदेश पदाधिकारी, केंद्रातील काही पदाघिकारी यांचा त्यात
समावेश आहे.
भाजपचे नेते दिवसभर चालणार्‍या या बैठकीत राज्यातील सर्व 48 मतदारसंघातील राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेणार असल्याचे समजते. या बैठकीची जागा, तसेच तेथील चर्चेसंदर्भात भाजपच्या नेत्यांनी अद्याप फारसे सांगितलेले नाही. मात्र, भाजप आणि मित्रपक्ष यांच्यातील जागावाटप, प्रचारातील मुद्दे, मतदारसंघनिहाय करावयाची व्यूहरचना यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या दहा मतदारसंघात, तसेच नगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघात भाजपचे मित्रपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकदही या भागात आहे.
गेल्या निवडणुकीत या बारा जागांपैकी भाजपने पाच, शिवसेनेने चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेचे चारही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असले, तरी यापैकी काही जागांवर भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नजर आहे. विरोधी पक्षाची विशेषतः शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या भागात आहे. त्यामुळे येथील सर्वच मतदारसंघांचा आढावा गांभीर्याने घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या नवीन पदाधिकाऱयांनी पक्षाच्या कार्यालयाचे स्थलांतर डी. पी. रस्त्यावरील नवीन इमारतीत केले असून, त्यानिमित्त पक्षकार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा रविवारी आयोजित केला आहे. या कार्यालयाला पक्षाचे वरीष्ठ नेते रविवारी भेट देणार असल्याने, पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण निर्मिती होणार आहे.
हेही वाचा

विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे : डॉ.जब्बार पटेल
..तर तोंड लपवायला जागा मिळणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्थकारण : विकासाचा पर्यायी मार्ग

Latest Marathi News भाजपची रणनिती ठरणार; राज्यातील 48 मतदारसंघांचा आज पुण्यात आढावा Brought to You By : Bharat Live News Media.