आता चक्क लाकडापासून बनणार स्मार्टफोनची स्क्रिन

लंडन : अनेक प्रकारच्या डिव्हाईसमधील डिस्प्लेसाठी दीर्घकाळापासून ग्लास आणि प्लास्टिकचा वापर होत आला आहे. मात्र भविष्यासाठी आता एक तिसरी सामग्रीही समोर आली आहे. भविष्यात आपल्या स्मार्टफोनची स्क्रीन किंवा डिस्प्ले चक्क लाकडापासून बनवलेला असेल. संशोधक त्यासाठी एका पारदर्शक लाकडावर काम करत आहेत. त्याचा वापर भविष्यात डिस्प्ले बनवण्यासाठी केला जाईल.
‘सायंटिफिक अमेरिकन’च्या एका रिपोर्टनुसार स्वीडनमध्ये केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधक लार्स बर्गलुंड यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. पारदर्शक लाकडाबाबत मेरीलँड विद्यापीठ (यूएम) संशोधकांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. अनेक वर्षांच्या प्रयोगांनंतर पारदर्शक लाकडाबाबत त्यांचे हे संशोधक आशादायक आहे.
बर्गलुंड आणि प्रमुख वैज्ञानिक लियांगबिंग हू यांनी सांगितले की पारदर्शक लाकडाची काही मिलीमीटर जाडीचा स्तर 80 टक्के ते 90 टक्के प्रकाश आरपार जाऊ देतो. हा स्तर एक सेंटीमीटर जाडीचा होतो तसा प्रकाश आरपार होणे कमी होते. दबावात लाकूड किती सहजपणे तुटू शकते याचे आकलन करण्यासाठी काही परीक्षणे करण्यात आली. त्यामध्ये आढळले की पारदर्शक लाकूड प्लेक्सीग्लासपेक्षा तिप्पट आणि काचेपेक्षा दहा पट अधिक मजबूत असते. जाडीने पातळ असल्याने लाकडाला प्लास्टिक आणि ग्लासचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. आशा आहे की भविष्यात स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि अन्य स्क्रीनमध्ये लाकडाचाच वापर होईल.
Latest Marathi News आता चक्क लाकडापासून बनणार स्मार्टफोनची स्क्रिन Brought to You By : Bharat Live News Media.
