Weather Update : आजपासून तीन दिवस थंडी अन् पाऊस

पुणे : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीसह उत्तर भारतात नव्याने तयार होणार्या पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात 7 ते 10 जानेवारी या कालावधीत हलका ते मध्यम पाऊस अन् किमान तापमानात घट होऊन थंडीतही वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पूर्वेकडील वार्यांच्या प्रभाव वाढल्याने राज्यात रविवार ते मंगळवार असा तीन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतातील सर्वच राज्यात नवा पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. त्या भागात 4 ते 8 अंशावर तापमान खाली आल्याने पुन्हा थंडीची लाट तीव्र झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही 7 ते 10 जानेवारी दरम्यान सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस पडेल तसेच किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
शनिवारचे तापमान..
नाशिक 13.5,पुणे 14.6, अहमदनगर 17.5,जळगाव 16.8, कोल्हापूर 19.4,महाबळेश्वर 14.1, मालेगाव 17, सांगली 19.7, सातारा 17.5, सोलापूर 17.7,छत्रपती संभाजीनगर 16.9, परभणी 17.1, नांदेड 18.8, अकोला 19,अमरावती 17.9, बुलढाणा 16.4, ब—ह्मपुरी 16.9, चंद्रपूर 15.4, गोंदिया 16.6, नागपूर 18.9, वाशिम 16.6
हेही वाचा
रायगड : डॉल्फिनच्या संचारामुळे समुद्र पर्यटनाला बहर
सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी; दुकानांवर दगडफेक
ताजनापूर योजनेत 9 गावांचा समावेश करा ; उपमुख्यमंत्र्यांना साकडे
Latest Marathi News Weather Update : आजपासून तीन दिवस थंडी अन् पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.
