बच्चा है पर मन का सच्चा है ! रोहित पवारांचं अजित पवारांना गाण्यातून प्रत्युत्तर 

पुढारी ऑनलाईन : पवारांच्या घरात या ना त्या कारणाने रोजची शाब्दिक जुगलबंदी रंगताना दिसते आहे. काल रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर पडलेल्या छाप्यानंतर आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझा आक्षेप ईडीवर नाही सर्व कागदपत्र आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या संस्था भारतात आहेत त्यांच्या कारवाया … The post बच्चा है पर मन का सच्चा है ! रोहित पवारांचं अजित पवारांना गाण्यातून प्रत्युत्तर  appeared first on पुढारी.

बच्चा है पर मन का सच्चा है ! रोहित पवारांचं अजित पवारांना गाण्यातून प्रत्युत्तर 

Bharat Live News Media ऑनलाईन : पवारांच्या घरात या ना त्या कारणाने रोजची शाब्दिक जुगलबंदी रंगताना दिसते आहे. काल रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर पडलेल्या छाप्यानंतर आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझा आक्षेप ईडीवर नाही सर्व कागदपत्र आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या संस्था भारतात आहेत त्यांच्या कारवाया झालेल्या आहेत. त्यांना सगळ्या कागदांची पूर्तता केली आहे. ज्यांच्यावर ईडीकडून कारवाई झालेली आहे ते तुमच्या सत्तेत आले आहेत त्या लोकाच काय?? माझं काही चुकलं असतं तर मी अजित दादांसोबत भाजपात असतो.’

बच्चा है पर मन का सच्चा है!
दिल है साफ, नफरत से है दूर… pic.twitter.com/BUKnifhtTz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 6, 2024

त्यांच्या या विधानावर अजित पवारांना छेडलं असता, रोहित अजून बच्चा आहे त्याला मी उत्तर देणं लागत नाही’ असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. तसेच खासदार संजय राऊत यांचा उल्लेख सोम्या गोम्या असा केला. आता अजित पवारांच्या या विधानावर शांत बसतील ते रोहित पवार कसले, ‘ यावर त्यांनी ट्वीट करत अजित पवारांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणतात, ‘ बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर…’ यासोबतच त्यांनी बच्चे मन के सच्चे हे ‘दो कालियां’ या हिंदी सिनेमातील गाणंही पोस्ट केलं आहे. यावर नेटिझन्सही दिलखुलास कमेंट करताना दिसत आहेत.
Latest Marathi News बच्चा है पर मन का सच्चा है ! रोहित पवारांचं अजित पवारांना गाण्यातून प्रत्युत्तर  Brought to You By : Bharat Live News Media.