भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घराला आग लागल्याने २६ वर्षीय महिला भाजल्याने जखमी झाली. भाग्यश्री भारत कढव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील अकोला येथील भारत कढव यांच्या घरी आज (दि.६) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत घर जळाल्याने तब्बल दीड लाख रुपयांचे … The post भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी appeared first on पुढारी.

भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी

भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा : स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घराला आग लागल्याने २६ वर्षीय महिला भाजल्याने जखमी झाली. भाग्यश्री भारत कढव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील अकोला येथील भारत कढव यांच्या घरी आज (दि.६) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
या आगीत घर जळाल्याने तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. महिलेला उपचारार्थ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्याचे दिसताच गावकरी मदतीला धावले. मोटारपंपाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परीसरातील आजूबाजूच्या घराचा धोका टळला. घटनेची माहिती आंधळगाव पोलिस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार व तलाठी संकेतकुमार बिरनवार, कोतवाल किसन सावसाखरे हे घटनास्थळी पोहोचले व संबंधित विभागाला माहिती दिली.
बालिका बचावली
घटनेच्या वेळी कढव यांची एक वर्षाची मुलगी पाळण्यात झोपली होती. आग लागल्याचे लक्षात येताच तिला सुखरूप घराबाहेर काढण्यात आले. तसेच जखमी भाग्यश्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा 

भंडारा : सनफ्लॅग कंपनीत स्फोट, ३ कामगार जखमी
भंडारा: भागवत सप्ताहात महिलांचे दागिने लंपास; ३ अज्ञात महिलांविरोधात गुन्हे
भंडारा: कैची दाखवून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

Latest Marathi News भंडारा: गॅस सिलिंडरचा स्फोट; महिला जखमी Brought to You By : Bharat Live News Media.