शरद मोहोळ खून : 2 वकिलांना ८ तर अन्य आरोपींना १० जानेवारीपर्यंत कोठडी

पुढारी वृत्तसेवा : काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा भरवस्तीत गोळ्या झाडून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली. शरद याच्या सतत सोबत असलेल्या साहिल पोळेकर यानेच मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यात दोन वकिलांचाही समावेश आहे. काल किकवी शिरवळ … The post शरद मोहोळ खून : 2 वकिलांना ८ तर अन्य आरोपींना १० जानेवारीपर्यंत कोठडी appeared first on पुढारी.

शरद मोहोळ खून : 2 वकिलांना ८ तर अन्य आरोपींना १० जानेवारीपर्यंत कोठडी

Bharat Live News Media वृत्तसेवा : काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा भरवस्तीत गोळ्या झाडून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली. शरद याच्या सतत सोबत असलेल्या साहिल पोळेकर यानेच मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यात दोन वकिलांचाही समावेश आहे. काल किकवी शिरवळ दरम्यान संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्तूल, ३ मॅगझीन, ५ राउंड आणि २ चार चाकी गाड्यांसह आरोपींना ताब्यात घेतले होते. या खून प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर केले गेले. या दरम्यान न्यायालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणातील 2 वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर इतर आरोपींना १० जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे), नामदेव महीपती कानगुडे (वय ३५, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे), चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे), विनायक संतोष गाव्हणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे), अॅड. रविंद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे), अॅड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी कॉलनी कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यादरम्यान मोहोळ याच्यावर हल्लाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून यात पोळेकर हा साथीदारांसह अगदी जवळून मोहोळ याच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे.
Latest Marathi News शरद मोहोळ खून : 2 वकिलांना ८ तर अन्य आरोपींना १० जानेवारीपर्यंत कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.