नागपूर : पोटच्या मुलाची जन्मदात्याने केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वत:च्याच मुलाची, पोटच्या गोळ्याची अडीच लाखांत तेलंगणात विक्री केल्याची घटना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मात्र, याची कुणकुण तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताचं तिने थेट आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना फोन व नोटांसह अटक केली. वडील श्रावण दादाराव देवकर(वय 32), चंद्रभान लकडाजी देवकर (वय 65, दोघेही रा. कोपरा), कैलास लक्ष्मण गायकवाड (वय 55, रा. गांधीनगर, आर्णी), बाल्या गोडंबे (रा. महागाव (कलगाव), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जगटाल जिल्ह्यातील मोहनरावपेठ गाठले. आणि बालकाला सुखरूप ताब्यात घेतले. बोलली गंगाराम राजू (वय 45, रा. मोहनराव) या महिलेने अरविंद रामय्या उसकेमवार (वय 45, रा. भाग्यनगर, आदिलाबाद) या एजंटच्या माध्यमातून खरेदी केले होते. त्यांनाही ताब्यात घेत आर्णी पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला असल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.
हेही वाचा
नागपूर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी १०० कुटुंबामागे एक प्रगणक
नागपूर : धावत्या रेल्वेत सहा जणांकडून लूटमार
School Van Drivers Strike : नागपूरमध्ये स्कूल व्हॅन चालकांचा एक दिवसीय संप
Latest Marathi News नागपूर : पोटच्या मुलाची जन्मदात्याने केली अडीच लाखांत तेलंगणात विक्री Brought to You By : Bharat Live News Media.
