खासदार राणा सहा महिन्यांत कारागृहात दिसतील : आंबेडकर

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : राणा दाम्पत्यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सतत घुमजाव सुरू आहे. कधी ते म्हणतात की, भाजप आम्हाला पाठिंबा देईल, कधी म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल. मात्र, मुलुंड कोर्टात का घिरट्या घातल्या जात आहेत, असा सवाल करताना खासदार नवनीत राणा येत्या सहा महिन्यांत जेलमध्ये दिसतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मविआ किंवा इंडिया आघाडीत समावेशाच्या दृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला वेटींगवर ठेवत आहे. आमची भूमिका भाजप विरोधी आहे. काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. दरम्यान, निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. सहा महिन्यांत निवडणूक घेतल्या पाहिजे. निवडणूक आयोग कायद्याने वागत नाही. सरकारच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. निवडणूक आयोग निःपक्षपाती राहला पाहिजे. कारवाईच्या भीतीपोटी आज राजकीय पक्ष आपली भूमिका घ्यायला घाबरत आहेत. खरेतर व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिले पाहिजे.
मुंबई हायकोर्टाने निवडणूक घ्यायचे सांगितले, तरी निवडणूक घेत नाही. निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की, तुमची वागणूक जनतेच्या विरोधात आहे. उद्या लोकांनी जर उठाव केला. तर तुम्ही जबाबदार आहे. शेवटी जनता ही देशाची मालक आहे, असेही आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना बजावले.
हेही वाचा
‘मविआ’त प्रकाश आंबेडकर येणार
प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाले; उध्दव ठाकरेंना मान्य आहे का? – बावनकुळे
प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करावे : आ. रोहित पवार
Latest Marathi News खासदार राणा सहा महिन्यांत कारागृहात दिसतील : आंबेडकर Brought to You By : Bharat Live News Media.
