मांसाहारी ठरविणार्‍यांना प्रभू श्रीरामच सद्बुद्धी देतील : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : देशामध्ये श्रीराम मंदिर नसल्याचा कलंक आपल्या छातीवर तब्बल 500 वर्षे होता. प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारलेल्या भव्य मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होत असल्याने तो कलंक पुसला जाणार आहे. मात्र, काही वाचाळवीर मंडळी श्रीरामाला मासांहारी ठरवत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू श्रीरामच त्यांना सद्बुद्धी देतील, अशी अप्रत्यक्ष टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … The post मांसाहारी ठरविणार्‍यांना प्रभू श्रीरामच सद्बुद्धी देतील : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

मांसाहारी ठरविणार्‍यांना प्रभू श्रीरामच सद्बुद्धी देतील : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : देशामध्ये श्रीराम मंदिर नसल्याचा कलंक आपल्या छातीवर तब्बल 500 वर्षे होता. प्रभू श्रीराम यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारलेल्या भव्य मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होत असल्याने तो कलंक पुसला जाणार आहे. मात्र, काही वाचाळवीर मंडळी श्रीरामाला मासांहारी ठरवत प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू श्रीरामच त्यांना सद्बुद्धी देतील, अशी अप्रत्यक्ष टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.
पिंपरी-चिंंचवडमधील सांगवी येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिर प्रसंगी शुक्रवार ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्रीराम मंदिरामुळे देशाला नवीन अस्मिता व ओळख मिळणार आहे. समाजातील शोषित, वंचित, दलित आदींना ज्या राज्यात महत्त्व मिळतेत्त, त्यांचे ऐकले जाते. ते खर्‍या अर्थाने रामराज्य होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे रामराज्य निर्माण केले होते. या मंदिरामुळे रामराज्याची संकल्पना भारतासह महाराष्ट्रात रुजली जाणार आहे.
हेही वाचा

Pune : पारगाव-चौफुला रस्त्याच्या कामाला विरोध
दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात
वैज्ञानिकांनी शोधले नवे प्रभावी अँटिबायोटिक

Latest Marathi News मांसाहारी ठरविणार्‍यांना प्रभू श्रीरामच सद्बुद्धी देतील : देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.