लक्ष्मण जगतापांचे कार्य पूर्ण करण्याचे बळ श्रीराम देतील : देवेंद्र फडणवीस
पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांची गरज ओळखून काम करणे आमदार लक्ष्मण जगताप यांनी काम केले. तो सक्षम नेता आपल्यात नाही. आ. अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व जगताप कुटुंबीय ते काम कार्य पुढे चाली ठेवतील. त्यांचे कार्य पूर्ण करण्याचे बळ प्रभु श्रीराम देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 5) व्यक्त केले. आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे आयोजित तीन दिवसीय अटल महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते.
या वेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, भीमराव तापकीर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, गिरीश प्रभुणे, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर उषा ढोरे, माजी उपमहापौर हिराबाई घुले, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व विविध विभागांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, की मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, या हेतूने शिबिराचे आयोजन केले आहे.
आतापर्यंत ऑनलाईन दीड लाख आणि ऑफलाईन 37 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या दिवशी 66 हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम स्कूलच्या आवारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, ‘फिरते वाचनालय’चा लोकार्पणही करण्यात आले.
महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांमध्ये आता ‘नो रेफरन्स’
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार उपचार मिळतात. तिथे काम करणार्या डॉक्टरांची गुणवत्ता खासगी रुग्णालयांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये कोणताही तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना खासगी रुग्णालयांचा ‘रेफरन्स’ देणार नाही. ‘नो रेफरन्स’ बाबत धोरणात्मक निर्णय झाला असून, त्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. कोणी डॉक्टर ‘रेफर’ करताना आढळ्यास त्याच्यावर कारवाई होईल, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिला आहे. त्यांच्या हस्ते अटल महाआरोग्य शिबिराचे सकाळी उद्घाटन झाले.
आतापर्यंत लाखो नागरिकांनी घेतला लाभ
अयोध्येत निर्माण होणार्या प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती देवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय विचार साधना संस्थेला मदत म्हणून ‘संस्कारक्षम विचार रथ’ची चावी प्रदान करण्यात आली. स्वागत करताना आ. अश्विनी जगताप म्हणाल्या, की सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी स्वाभिमानाने लढणारे आ. लक्ष्मण जगताप यांना एका दुर्धर आजाराने आमच्यातून हिरावून घेतले. गोरगरिब नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी. उपचाराअभावी नागरिक वंचित राहता कामा नये. या भावनेतून 9 वर्षांपासून हे शिबिर घेतले जात आहे.
हेही वाचा
दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात
Pimpri : दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने पेटवले घऱ
वैज्ञानिकांनी शोधले नवे प्रभावी अँटिबायोटिक
Latest Marathi News लक्ष्मण जगतापांचे कार्य पूर्ण करण्याचे बळ श्रीराम देतील : देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.