Jalgaon News : ट्रान्सफॉर्मरची तार चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या
जळगांव : Bharat Live News Media वृत्तसेवा ; चाळीसगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सफॉर्मर मधून अज्ञात चोरट्यांनी तांब्याची तार व प्लेट्स असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मॉर्निसा बायो ऑर्गनिक प्रायव्हेट लिमेटेड, या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेला ट्रान्सफर मधील तांब्याच्या तारा व प्लेटा आरमाड केबल असा चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी सचिन केशवराव नागरे यांनी फिर्याद दिली होती.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोना दिपक पाटील, सफौ शशिकांत महाजन, पोहेकॉ योगेश बेलदार, नितीन वाल्हे, पोकॉ भरत गोराळकर, अमोल पाटील, नंदकिशोर महाजन, अजय पाटील, अमोल भोसले यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी अहमद शेख ईस्माईल (वय-२७) व सलमान बेग हुसेन बेग (वय-२६) दोन्ही रा. जहागिरदारवाडी, चाळीसगांव यांना सापळा रचून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली व त्यांच्याकडून एक लाख चार हजार सहाशे नव्वद रुपये किमतीची आरमार केबल जप्त करण्यात आलेली आहे.
Latest Marathi News Jalgaon News : ट्रान्सफॉर्मरची तार चोरणाऱ्या चोरट्यांना बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.