दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात आपलाच खासदारकीचा उमेदवार जिंकला पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच महिन्यात मतदारसंघात दौरे ठेवल्याने राजकीय चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकताच मतदारसंघात शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून … The post दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात appeared first on पुढारी.

दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात

संतोष वळसे पाटील

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघात आपलाच खासदारकीचा उमेदवार जिंकला पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच महिन्यात मतदारसंघात दौरे ठेवल्याने राजकीय चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नुकताच मतदारसंघात शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आक्रोश मोर्चाची किती दखल आपल्या दौर्‍यात घेतात, याबद्दल उत्सुकता आहे. या नेत्यांच्या दौर्‍यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता ‘सोशल मीडिया’द्वारे चालू असल्याने मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेड तालुक्यात शिवसंकल्प अभियानांतर्गत सुरू होणार्‍या विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. 6) हजेरी लावणार आहेत, तर 13 तारखेला शरद पवार हे जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार 25 जानेवारी रोजी जुन्नर तालुक्याच्या दौर्‍यावर येणार असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसंपर्क अभियान मेळाव्यात शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव घोषित करणार असल्याची चर्चाही शिवसैनिकांमध्ये आहे. तर दुसरीकडे जुन्नर येथे शनिवारी (दि. 13) शरद पवार यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलीप वळसे पाटील भूषविणार आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने शरद पवार हे शेरकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांना जुन्नरच्या उमेदवारीचे ‘गिफ्ट’ देणार जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा कल हा अजित पवार गटाकडे जास्त असल्याने पुढील काळात त्यांच्याविरोधात सत्यशील शेरकर हा तगडा उमेदवार शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो, अशी चर्चा जुन्नर तालुक्यात होत आहे.
खा. डॉ. कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चात राज्य, केंद्र सरकार तसेच अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केल्याने राजकीय वातावरण गरम झाले होते. त्यातच आता एकनाथ शिंदे, शरद पवार हेदेखील शिरूर लोकसभा मतदारसंघात येणार असल्याने कोण कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षांकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, अजित पवार गट, अद्याप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते शांततेच्या भूमिकेत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाची ताकद मोठी असल्याने पुढील काळात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हे एकमेकांना भिडताना
दिसणार आहेत.
Latest Marathi News दोन्ही पवार आणि मुख्यमंत्री शिरूर लोकसभेच्या मैदानात Brought to You By : Bharat Live News Media.