मावळात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन

वडगाव मावळ : भारतीयांचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य करून हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष दत्ता गुंड यांनी केली आहे. वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोरील चौकात भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, ज्येष्ठ … The post मावळात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन appeared first on पुढारी.

मावळात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन

वडगाव मावळ : भारतीयांचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य करून हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष दत्ता गुंड यांनी केली आहे.
वडगाव मावळ येथील पंचायत समिती समोरील चौकात भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, प्रशांत ढोरे, रघुवीर शेलार, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, संतोष कुंभार, सुधाकर ढोरे, महिलाध्यक्षा सायली बोत्रे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन मराठे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
भाजपचे वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चाखे अध्यक्ष विनायक भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, अभिमन्यू शिंदे, सचिन येवले, अविनाश गराडे, सुभाष देशमुख, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिजित नाटक, हभप सुनीलमहाराज वरघडे, शिवांकुर खेर, अशोक ठुले, एकनाथ पोटफोडे, शरद साळुंखे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणावळ्यात कार्यकर्त्यांनी केला निषेध

 लोणावळा : प्रभू श्रीराम यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा लोणावळा शहर भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी शुक्रवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच. लोणावळा शहर पोलिस ठाण्यात जाऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
 समस्त हिंदूच्या भावना दुखविण्याचे काम आव्हाड यांनी केले आहे. तसेच, वारंवार वादग्रस्त विधाने करायचा सपाटाच आव्हाड यांनी लावला असल्याने त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे या वेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.
 भाजपचे लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आशिष बुटाला, रामविलास खंडेलवाल, योगिता कोकरे, हर्षल होगले, राजू परदेशी, शुभम मानकामे, पार्वती रावळ, संतोष जंगले, हेमंत कांबळे, दिनेश ओसवाल, सचिन पत्की, बाबू संपत यांसह अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा

Drugs Case : मावळात दोन लाखांचे ड्रग्स जप्त
Pimpri : दारू प्यायला पैसे न दिल्याने मुलाने पेटवले घर
लोकसभेच्या मदतीसाठी खा. सुळेंनी घेतली थोपटे पिता-पुत्रांची भेट

Latest Marathi News मावळात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.