चूक असती तर आता अजित दादांसोबत भाजपात असतो: आ. रोहित पवार

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांच्या बारामती  ॲग्रो कंपनीच्या बारामती, पुणे, मुंबईसह एकूण सहा कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापेमारी केली. या करवाईनंतर रोहित पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. ‘रोहित पवारांनी शहीद होण्याचा प्रयत्न करू नये. व्यवसाय आहे त्या व्यवसायात ह्या गोष्टी होत असतात’ … The post चूक असती तर आता अजित दादांसोबत भाजपात असतो: आ. रोहित पवार appeared first on पुढारी.

चूक असती तर आता अजित दादांसोबत भाजपात असतो: आ. रोहित पवार

पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांच्या बारामती  ॲग्रो कंपनीच्या बारामती, पुणे, मुंबईसह एकूण सहा कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापेमारी केली. या करवाईनंतर रोहित पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
‘रोहित पवारांनी शहीद होण्याचा प्रयत्न करू नये. व्यवसाय आहे त्या व्यवसायात ह्या गोष्टी होत असतात’ या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर तुमचं मत काय? असं रोहित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की ‘देवेंद्र फडणवीस साहेबांचे हे विधान ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, मी शहीद होण्याचं कारण काय? मी तस काही चुकीचं बोललो नव्हतो, मी भारताच्या बाहेर होतो. मी चुकीचं केलं असतं तर मी आलोच नसतो, 10 ते 15 दिवस बाहेर थांबलो असतो. या आधी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे तेव्हा ते एक तर दिल्लीला भेटायला गेले नाही तर सत्ताबद्दल तरी झालेला दिसला. लोकांना महिती आहे कार्यवाही का केली.?’
अधिकाऱ्यांच काही चुकत नाही
ते पुढे म्हणाले की ‘अधिकाऱ्यांचे काही चुकत नाही, त्यांना ज्या ऑर्डर दिल्या जातात तसे ते करतात. आश्चर्य एका गोष्टीच वाटतं की ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर मला ऐकायला बघायला मिळतात. ही कागदपत्रे मीडियापर्यंत कोण पोहचवतो?’ असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला.
अजित पवारांवर खोचक टीका.
आमदार सुनील कांबळे अजितदादा मित्रा मंडळातील एकाला अजित दादांच्या मित्र मंडळाससमोर मारतात तरी अजित दादा काही बोलत नाहीत. यावरून सगळं स्पष्ट दिसत आहे.. ज्या शहरात गृह खात्याचे मंत्री आलेले असतात त्या शहरात दिवसाढवळ्या खून होतात, या राज्यात कायदा व सुव्यवस्था अतिशय वाईट स्तरावर गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहखात्याकडे लक्ष द्यावे अन्यथा राजीनामा तरी द्यावा’
रोहित पवार पुढे म्हटले की ‘माझा आक्षेप ईडीवर नाही सर्व कागदपत्र आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या संस्था भारतात आहेत त्यांच्या कारवाया झालेल्या आहेत. त्यांना सगळ्या कागदांची पूर्तता केली आहे. ज्यांच्यावर ईडीकडून कारवाई झालेली आहे ते तुमच्या सत्तेत आले आहेत त्या लोकाच काय?? माझं काही चुकलं असतं तर मी अजित दादांसोबत भाजपात असतो.’ आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला कानशिलात लागवण्याबाबत रोहित पवार बोलले की शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पोलिसांना मारहाण करण्याची नवीन प्रथा सुरू झालेली आहे. ते काही नवीन नाही.
हेही वाचा

वैज्ञानिकांनी शोधले नवे प्रभावी अँटिबायोटिक
ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी आणखी ३ जणांना अटक
Pawangad : पावनगडावरील अनधिकृत मदरसा हटवला

Latest Marathi News चूक असती तर आता अजित दादांसोबत भाजपात असतो: आ. रोहित पवार Brought to You By : Bharat Live News Media.