बांगलादेशात हिंसाचार, ट्रेन जाळल्याने चौघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी राजधानी ढाका येथे एका पॅसेंजर ट्रेनला आग (train fire) लागली. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही ट्रेन भारताच्या सीमेला लागून असलेल्या बेनापोल बंदर शहरातून ढाक्याला येत होती. गोपीबाग येथील कमलापूर रेल्वे स्थानकाजवळ बेनापोल एक्स्प्रेसचे पाच डबे अज्ञातांनी पेटवून … The post बांगलादेशात हिंसाचार, ट्रेन जाळल्याने चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

बांगलादेशात हिंसाचार, ट्रेन जाळल्याने चौघांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन दिवस आधी शुक्रवारी राजधानी ढाका येथे एका पॅसेंजर ट्रेनला आग (train fire) लागली. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही ट्रेन भारताच्या सीमेला लागून असलेल्या बेनापोल बंदर शहरातून ढाक्याला येत होती. गोपीबाग येथील कमलापूर रेल्वे स्थानकाजवळ बेनापोल एक्स्प्रेसचे पाच डबे अज्ञातांनी पेटवून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Benapole Express Train)

#WATCH | A passenger train was set on fire in Bangladesh’s capital Dhaka yesterday (January 5) ahead of the country’s general election this weekend.
At least four people died aboard the intercity train, reports Reuters quoting local newspaper Dhaka Tribune.
(Source: Reuters) pic.twitter.com/FoFZVsqZ6u
— ANI (@ANI) January 6, 2024

अग्निशमन दलाचे प्रवक्ते शाहजहान शिकदार यांनी माध्यमांना सांगितले की, आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहेत. अजूनही शोध सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये सुमारे २९२ प्रवासी होते, त्यापैकी बहुतांश प्रवासी भारतातून घरी परतत होते आणि रात्री ९ वाजता ढाका येथील गोपीबाग परिसरात येताच अज्ञातांनी ट्रेन पेटवून (train fire)दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या. (Benapole Express Train)
दरम्यान, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस (डीएमपी) अतिरिक्त आयुक्त माहिद उद्दीन यांनी बेनापोल एक्स्प्रेस ट्रेनवरील जाळपोळ हा नियोजित हल्ला असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, जाळपोळ कोणी केली हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण हे जाणूनबुजून केले गेले. सामान्य लोक, मुले आणि महिलांशी असे वागणे अमानवी आहे. आम्ही दोषींना न्याय मिळवून देऊ, असे ते म्हणाले.
बांगलादेशमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुका
बांगलादेशमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तीन भारतीय निरीक्षकांसह सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १०० हून अधिक परदेशी निरीक्षक ढाका येथे पोहोचले आहेत. मात्र, देशातील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) निवडणुका घेण्यासाठी अंतरिम सरकारची मागणी करत आहे. मात्र पंतप्रधान शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे.
The post बांगलादेशात हिंसाचार, ट्रेन जाळल्याने चौघांचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.