तकलादू चिनी इलेक्ट्रिकल वस्तू विकल्यास 2 वर्षे जेल!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अनेक निर्बंध, जनआंदोलनांनंतरही इलेक्ट्रिकल बाजारात तकलादू चिनी उत्पादनांच्या विक्रीला आळा घालता न आल्याने केंद्र सरकारने त्याविरोधात आता कठोर पाऊल उचलले आहे. तकलादू इलेक्ट्रिक प्रॉडक्ट विकल्यास अगर त्याचे उत्पादन केल्यास 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
तकलादू चिनी इलेक्ट्रिकल उत्पादनांमुळे विजेशी संबंधित दुर्घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे आता विक्रीविरोधात कडक नियम केले आहेत. तकलादू वस्तूंच्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने स्विच-सॉकेट-आऊटलेट आणि केबल ट्रंकिंगसारख्या वीज साहित्यावर अनिवार्य गुणवत्ता मानके जारी केली आहेत.
उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने विद्युत सहायक उपकरण गुणवत्ता नियंत्रण आदेश 2023 जारी केला आहे. भारतीय मानक ब्यूरोचे चिन्ह असल्याशिवाय वस्तूंचे उत्पादन, विक्री, व्यापार, आयात आणि साठा करता येणार नाही. देशांतर्गत पातळीवर उत्पादित वस्तूंवर हा कायदा लागू नाही. लघू, कुटीर आणि मध्यम उद्योगांना सवलत देण्यात आली असून, लहान उद्योगांना 9 महिन्यांचा कालावधी त्यासाठी मुदत म्हणून दिला आहे.
The post तकलादू चिनी इलेक्ट्रिकल वस्तू विकल्यास 2 वर्षे जेल! appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी तकलादू चिनी इलेक्ट्रिकल वस्तू विकल्यास 2 वर्षे जेल!
तकलादू चिनी इलेक्ट्रिकल वस्तू विकल्यास 2 वर्षे जेल!
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अनेक निर्बंध, जनआंदोलनांनंतरही इलेक्ट्रिकल बाजारात तकलादू चिनी उत्पादनांच्या विक्रीला आळा घालता न आल्याने केंद्र सरकारने त्याविरोधात आता कठोर पाऊल उचलले आहे. तकलादू इलेक्ट्रिक प्रॉडक्ट विकल्यास अगर त्याचे उत्पादन केल्यास 2 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तकलादू चिनी इलेक्ट्रिकल उत्पादनांमुळे विजेशी संबंधित दुर्घटना सातत्याने घडत आहेत. …
The post तकलादू चिनी इलेक्ट्रिकल वस्तू विकल्यास 2 वर्षे जेल! appeared first on पुढारी.
