पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्यस्तरावर थेट नियुक्त्या देण्याबाबतचा प्रस्ताव २०१८ पासून रखडला आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होऊन येत्या काही दिवसांत त्यांना नियुक्त्या देण्यात येतील. तसेच क्रीडा विभागातील अनेक पदे रिक्त असून, त्याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व … The post पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे appeared first on पुढारी.

पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- राज्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्यस्तरावर थेट नियुक्त्या देण्याबाबतचा प्रस्ताव २०१८ पासून रखडला आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होऊन येत्या काही दिवसांत त्यांना नियुक्त्या देण्यात येतील. तसेच क्रीडा विभागातील अनेक पदे रिक्त असून, त्याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभंकर अनावरणासाठी ते नाशिक दौऱ्यावर होते. आढावा बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री बनसोडे म्हणाले, तीन वर्षांपासून प्रलंबित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पारितोषिक रकमेमध्ये वाढ करत असल्याचे सांगितले. यापूर्वी जीवनगौरव पुरस्काराला ३ लाख रुपये होते, तर यंदापासून ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच खेळाडूसाठी १ लाख रुपयांवरून ३ लाख अशी वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनसाठी भव्य असे ऑलिंपिक भवनची निर्मिती प्रस्तावित आहे. ऑलिंपिक म्युझियमची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठीचे भूमिपूजनदेखील लवकर करण्यात येणार आहे. तसेच पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येऊन तात्पुरत्या स्वरूपात कुलगुरूची नेमणूक करण्यात येणार आहे.
प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा दहीहंडी स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि सहासी खेळाचा दर्जा, खेळाडूंना विमाकवच देण्यात आले आहे. व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत व्यायामशाळा बांधकामासाठी रक्कम यापूर्वी ७ लाख रुपये देण्यात येत होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, आता १४ लाख रुपये देण्यात येणार आहे. प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया पॅरागेम्स दिल्लीसाठी एकूण सात खेळामध्ये राज्यातील 77 खेळाडूंचा सहभाग आहे. त्या सर्व खेळाडूंना मदत करण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल बांधकामाकरिता 10 कोटी रुपये, जिल्हा क्रीडा संकुलाकरिता 50 कोटी रुपये, विभागीय क्रीडा संकुलाकरिता 75 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात आली.
पारितोषिक रकमेत 10 पट वाढ
आशियाई क्रीडा स्पर्धेत पात्र खेळाडूंना पूर्वतयारीसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये व दिव्यांग खेळाडूंना २ लाख रुपये खेळाडूच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. पदकविजेत्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेमध्ये 10 पट वाढ करण्यात आली असून, वैयक्तिक सुवर्णपदक 1 कोटी, रौप्यपदक 75 लाख, कांस्यपदक ५० लाख तसेच सांघिक सुवर्णपदक ७५ लाख, रौप्यपदक 50 लाख, कांस्यपदक 25 लाख मार्गदर्शकांना खेळाडूच्या पारितोषिक रकमेच्या 10 टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना रुपये १० लाख पारितोषिक जाहीर करण्यात आले.
मिशन लक्षवेध
राज्यातून ऑलिंपिक व जागतिक स्तरावर पदकप्राप्त खेळाडू तयार करण्यासाठी जिल्हा केंद्र मानून खेळातील खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षणाची योजना तयार करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यात 138 केंद्रे 8 विभागीय मुख्यालय ठिकाणी 37 प्रशिक्षण केंद्रे 12 क्रीडा प्रकरांची हायपरफाॅर्मन्स सेंटर, अद्ययावत स्पोर्ट्स सायन्स प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे.
नमो क्रीडा संकुल योजना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित राज्यात नमो क्रीडा संकुल योजना राबविण्यात येणार आहे. 11 कलमी कार्यक्रमांतर्गत क्रीडा विभागामार्फत राज्यातील 73 ठिकाणी क्रीडांगण क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार आहे.
राज्य क्रीडा दिन
भारतासाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारात ऑलिंपिक पदक मिळवणारे ऑलिंपिक वीर कै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
हेही वाचा

Pune : पारंपरिक पेहरावातील दुचाकी फेरीने शंभराव्या नाट्य संमेलनाची नांदी
तेजस्वी कर्मयोद्धा
कर थकबाकीपोटी 32 मिळकतींचा लिलाव आजपासून; लिलावाची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे Brought to You By : Bharat Live News Media.